7/12 बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! एका झटक्यात ओळखा सातबारा बनावट का खरा? जाणून घ्या सोप्या 2 ट्रिक

7/12 बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! एका झटक्यात ओळखा सातबारा बनावट का खरा? जाणून घ्या सोप्या 2 ट्रिक

शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा (7/12) असतो. कारण सातबारा मुळेच सदर जमीन (Land Proof) कोणाची आहे, याची सगळी माहिती 7/12 च्या आधारावर कळते. कारण बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, त्यामुळे पुरावा हि काळाची गरज आहे. आपला मालकी (Financial) हक्क सादर करण्यासाठी आणि आपली जमीन (Department of Agriculture) दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये. म्हणून शेतकऱ्यांसाठी (Agriculture) सातबारा प्रचंड महत्वाची भूमिका बजावतो.

शेतकरी फसवणुकीला पडतात बळी

अनेकदा बोगस सातबारा 7/12 उताऱ्याची प्रकरणे समोर येत असतात. काही वेळा जमीन खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांना (Farming) बोगस सातबारा देऊन फसवणूक केली जाते. तर अनेकदा बोगस 7/12 वापरून (Bank Loan) अशा प्रकारची कर्ज घेतली जातात. ज्यामुळे आतापर्यंत अनेक अशा लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यामुळेच जमिनीचा 7/12 खरा आहे की, बनावट हे तपासणे महत्वाचं आहे. चला तर जमिनीचा सातबारा तपासण्याच्या सोप्या 3 पद्धती जाणून घेऊयात.

सहज तपासा सातबारा बनावट की खरा?

१) तलाठ्यांची सही पडताळावी

जमिनीची खरेदी विक्री करते वेळेस 7/12 उताऱ्यावर तलाठ्यांनी सही घेतली जात असते. ज्या ७/१२ वर तलाठ्यांची सही नसते, तो बोगस सातबारा असतो. यावरून तुम्ही ७/१२ उतारा खरा आहे की बोगस हे समजू शकते. गेल्या दीड वर्षांपासून आता सातबारा वर डिजिटल सही केली जाते.

२) क्यूआर कोड

आता आधुनिक जगात सगळ काही डिजिटल होत चाललं आहे. त्याचवेळी आता जमिनीचा सातबारा देखील सध्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. जर तुमच्या सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड दिला नसेल तर तुमचा ७/१२ उतारा बोगस आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला खरा सातबारा दिसेल.

डिजिटल सातबारा उपलब्ध

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी अपडेटेड ७/१२ उतारा वापरावा. तसेच हे डिजिटल युग आहे, त्यामुळे ७/१२ आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचाच वापर करावा. यामुळे कोणतीही व्यक्ती फसवणुकीला बळी पडणार नाही. हा डिजिटल ७/१२ पाहण्यासाठी तुम्हाला सरकारच्या महाभूमी वेबसाईटवर जावे लागेल.

7/12

Leave a Comment