7-12 ओळखा बोगस का खरा? असा पहा

7-12 / 7/12

शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा (७/१२) असतो. कारण सातबारा मुळेच सदर जमीन (Land Proof) कोणाची आहे, याची सगळी माहिती सातबारा च्या आधारावर कळते. कारण बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, त्यामुळे पुरावा हि काळाची गरज आहे. आपला मालकी (Financial) हक्क सादर करण्यासाठी आणि आपली जमीन (Department of Agriculture) दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये. म्हणून शेतकऱ्यांसाठी (Agriculture) सातबारा प्रचंड महत्वाची भूमिका बजावतो.

शेतकरी फसवणुकीला पडतात बळी

अनेकदा बोगस सातबारा सातबारा उताऱ्याची प्रकरणे समोर येत असतात. काही वेळा जमीन खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांना (Farming) बोगस सातबारा देऊन फसवणूक केली जाते. तर अनेकदा बोगस सातबारा वापरून (Bank Loan) अशा प्रकारची कर्ज घेतली जातात. ज्यामुळे आतापर्यंत अनेक अशा लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यामुळेच जमिनीचा ७/१२ खरा आहे की, बनावट हे तपासणे महत्वाचं आहे. चला तर जमिनीचा सातबारा तपासण्याच्या सोप्या 3 पद्धती जाणून घेऊयात.

सहज तपासा 7-12 बनावट की खरा? (7/12)

१) तलाठ्यांची सही पडताळावी

जमिनीची खरेदी विक्री करते वेळेस सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांनी सही घेतली जात असते. ज्या सातबारा वर तलाठ्यांची सही नसते, तो बोगस सातबारा असतो. यावरून तुम्ही सातबारा उतारा खरा आहे की बोगस हे समजू शकते. गेल्या दीड वर्षांपासून आता सातबारा वर डिजिटल सही केली जाते.

२) LGD कोड व ई-महाभूमीचा लोगो 7/12

आता नव्या बदलांनुसार ७/१२ वर ज्या गावात जमीन आहे, त्या गावचा युनिक कोड देखील ७/१२ वर देण्यात येतो. जर हा कोड तुमच्या सातबाऱ्यावर असेल तरच तुमचा सातबारा खरा आहे. हा कोड नसेल, तर तो बोगस असतो. त्याचबरोबर २ मार्च २०२२ ला राज्य सरकारकडून ७/१२ उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा व ई-महाभुमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. जर तुमच्या सातबाऱ्यावर हा लोगो असेल तर तुमचा ७/१२ खरा असेल अन्यथा बोगस गृहीत धरला जाईल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा सातबारा खरा आहे की खोटा हे तपासु शकता.

३) 7-12 क्यूआर कोड (7/12)

आता आधुनिक जगात सगळ काही डिजिटल होत चाललं आहे. त्याचवेळी आता जमिनीचा सातबारा देखील सध्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. जर तुमच्या सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड दिला नसेल तर तुमचा ७/१२ उतारा बोगस आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला खरा सातबारा दिसेल.

असा काढा डिजिटल सातबारा

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी अपडेटेड 7-12 उतारा वापरावा. तसेच हे डिजिटल युग आहे, त्यामुळे ७/१२ आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचाच वापर करावा. यामुळे कोणतीही व्यक्ती फसवणुकीला बळी पडणार नाही. हा डिजिटल ७/१२ पाहण्यासाठी तुम्हाला सरकारच्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/Registration/UserRegistration वेबसाईटवर जावे लागेल. या साईट वर आल्यानंतर पर्सनल माहिती भरून घ्या. नंतर खाली Address Information याच्यामध्ये माहिती भरून घ्या. नंतर खाली Login Information दिसत आहे. तिथे युजर आयडी म्हणून तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. लॉगीन आयडी भरल्यानंतर चेक Check Availability या पर्यायावर क्लिक करा.

7-12

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला समोर एक सेक्युरिटी प्रश्न निवडायचा आहे आणि त्याच्या पुढील बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली एक पाच अंकाचा कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा तुम्हाला समोरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि Submit या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुमच युजर आयडी आणि पासवर्ड तयार झालं आहे. आता Click Here या पर्यायावर क्लिक करा.

नंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घ्या. नंतर कॅप्चा टाकून लॉगीन या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला 7-12 डाऊनलोड करण्यासाठी एक ७/१२ काढायचा असेल तर १५ रु. लागणार आहेत. तर तुम्हाला आता Recharge Account या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला वॉल्लेट मध्ये पैसे जमा करायचे आहेत. तुम्हाला वॉल्लेट मध्ये कमीतकमी १५ रुपये जमा करण गरजेच आहे. कारण आपल्याला एक सातबारा डाऊनलोड करण्यासाठी कमीतकमी १५ रुपये लागणार आहेत.

तुम्ही वॉल्लेट मध्ये पैसे जमा केल्यानंतर आता सातबारा डाउनलोड करण्यासाठी Digitally signed 7-12 या पर्यायावर क्लिक करा. पहिल्या पर्यायामध्ये तुमचा जिल्हा निवडा, नंतर तालुका निवडा आणि नंतर गाव निवडा. आता खाली तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे.गट नंबर टाकल्यानंतर गट नंबर निवडा या पर्यायावर क्लिक करून गट नंबर निवडायचा आहे. गट नंबर निवडल्यानंतर खाली डाऊनलोड हा पर्याय दिसेल. सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला डाऊनलोड या बटणावर क्लिक करा. आता तुमचा सातबारा डाऊनलोड झाला आहे.

अशाच शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, नवीन योजना, नवीन माहिती वाचण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

👇फॉलो/जॉईन करा👇
@Telegram Group- https://telegram.me/digishetkari
@Instagram – https://instagram.com/maheshbhosaleofficial

Leave a Comment