हवामान अंदाज: महाराष्ट्रात या तारखेला मान्सून लावणार हजेरी, पंजाब डख यांचा हवामान अंदाज
शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांचा मान्सूनबाबत हवामान अंदाज. पंजाबराव डख यांनी वेळोवेळी सांगितले जाणारे अंदाज आणि त्यानुसार झालेला पाऊस यामुळे शेतकरी पंजाबराव डख यांच्या अंदाजांची वाट पाहत असतात.
पंजाबराव डख हवामान अंदाज
पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार, यावर्षी महाराष्ट्रामध्ये 8 जून 2023 ला मान्सून चे आगमन होईल. सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 जून पर्यन्त मान्सून चे आगमन होईल.
हे पण वाचा: Ration card rules | ‘या’ लोकांचं रेशन कार्ड होणार रद्द, काय आहे सरकारचा नवा नियम?; जाणून घ्या सविस्तर |
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या पेरण्या 27 ते 30 जून पर्यन्त होतील, ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या या कालावधीत होणार नाही, त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलै महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात पूर्ण होतील. असा अंदाज पंजाबराव डख यांनी यावेळी सांगितलेला आहे.
यावर्षीचा पाऊस जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात जास्त असणार आहे. तर जुलै च्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये अधिक पाऊस राहणार असं डख यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार यावर्षीचा मान्सून हा 2022 यावर्षी सारखाच पाऊस होईल. यावर्षी 2022 सारखाच पाऊस असल्यामुळे कृष्णा नदी काठावर यावर्षीही महापूर येण्याची शक्यता असल्याचा दावा पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.