Pradhan Mantri Matruvandana Yojana: केंद्र सरकारच्या या योजनेमार्फत महिलांना ५,००० रूपयांची रक्कम दिली जाते. ही महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे जिचा फायदा फक्त गर्भवती महिलाच घेऊ शकतात. प्रधानमंत्री मातू वंदना योजना ही पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी सरकारची महिलांसाठी अतिशय महत्वपूर्ण योजना आहे. Pradhan Mantri Matruvandana Yojana गर्भवती महिला आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही एक योजना आहे. महिलांचे आरोग्य सुधारून त्यांच्यातील कुपोषण दूर करणे, त्यांना योग्य उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश्य आहे.
Pradhan Mantri Matruvandana Yojana
पीएम मातृ वंदना योजनेत गर्भवती आणि स्तनदा मातांना ५,००० रूपये बँक खात्यावर दिले जातात. हे 5000 रूपये तीन हप्त्यामध्ये महा डीबीटी पोर्टलद्वारे महिलांच्या खात्यावर जमा केले जातात. महिलांना या योजनेत नोंदणी करताना 1,000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. 6 व्या महिन्यामध्ये किमान एका तपासणीनंतर 2,000 रूपयांचा दुसरा हप्ता मिळतो. तिसऱ्यांदा बाळाच्या जन्मानंतर नोंदणी झाल्यानंतर 2,000 रूपयांचा हप्ता दिला जातो.