शेती करण्यासाठी लागणाऱ्या विविध शेती अवजारांची तसेच शेततळे व अन्य विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता महाडीबीटी हे पोर्टल शासनाने सुरू केलेले आहे. एका अर्जामध्येच विविध योजनांचा लाभ देण्याची सुविधा सरकारने या पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे. साधारणपणे अर्जाची संख्या बऱ्यापैकी झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसात सोडत यादी काढून शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.
सोडत मध्ये शेतकऱ्याचे नाव आल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला थेट मेसेज पाठवला जातो. त्या मेसेज मध्ये आपण लाभार्थी यादी मध्ये निवड झाली आहे. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळवणे सोपे झाले आहे. गेल्या ७ ते 8 दिवसांपासून महाडीबीटीवर योजनाच्या लाभासाठी तातडीने अर्ज करावेत कारण पंधरा मे पासून कुठल्याही पद्धतीची सोडत होणार नसल्याची बातमी प्रसारित होत आहे.
महाडीबीटी अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध हा संदेश चुकीचा
या मेसेजमुळे शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र कृषी विभागाकडून अथवा राज्य शासनाकडून असा कुठलाही आदेश दिलेला नाही. हे संदेश खोटे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेज वरती विश्वास ठेवू नये असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे. अशा चुकीच्या व खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवून शेतकऱ्यांनी कृषी योजनांच्या लाभासाठी अर्ज करणे चालू ठेवावे. असे आव्हान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे.