Pm Kisan 14th Installment | पीएम किसानचा 14 वा हप्ता 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, लगेच यादीत नाव चेक करा..

Pm Kisan 14th Installment | पीएम किसान निधीच्या 14 व्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थान येथून Pm kisan सन्मान निधीचा 14 वा हप्ता जारी केला आहे. pm किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आले आहे. 9 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्ये पीएम किसान (Pm Kisan 13th Installment) 13 वा हप्ता देण्यात आला होता.

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली – Pm Kisan 14th Installment

शेतकरी मित्र 14 व्या हप्त्याची आतुरतेने अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, ती प्रतीक्षा आता संपली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयेचा हप्ता पाठवला आहे. परंतु जर तुम्हाला पीएम किसान योजनेबाबत कोणत्याही प्रकारची समस्या येत असल्यास तुम्ही शेतकरी अधिकृत ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता. याशिवाय पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक- 1155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.

याप्रमाणे यादी तपासा – Pm Kisan 14th Installment

  • पीएम किसान च्या आधिक्रत https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर या/जा.
  • लाभार्थी यादीवर क्लिक करा. click here
  • राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारखे तपशील प्रविष्ट करा आणि अहवाल मिळवा वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल. येथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

‘अशा’प्रकारे तपासा हप्ता मिळाला का?

  • 14 वा हप्ता आज जारी करण्यात आला आहे. या 2000 रुपयाचा तुम्हाला बँकेकडून मेसेज आला असेल. याशिवाय लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही शासनाकडून हप्ता सोडल्याचा संदेश पाठविण्यात येत असतो.

Leave a Comment