Agriculture लासलगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज कांदा बाजारभाव असे आहेत. याशिवाय धान्य, फळे, भाजीपाला आणि फुलांचे भाव असे आहेत.
लासलगावी कांदा बाजारभाव टिकून; राज्यात असे आहेत शेतमालाचे बाजारभाव
लासलगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज कांदा बाजारभाव असे आहेत. याशिवाय धान्य, फळे, भाजीपाला आणि फुलांचे भाव असे आहेत.
लासलगावी कांदा बाजारभाव टिकून; राज्यात असे आहेत शेतमालाचे बाजारभाव
लासलगाव बाजारसमितीचे उपबाजार आवार असलेल्या विंचूर बाजारसमितीत आज सकाळी उन्हाळी कांद्याचे ११५६ नग दाखल झाल्याने विंचूर बाजारसमितीच्या बाहेर असलेल्या राज्य महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आजही बाजारभाव टिकून राहिल्याची माहिती लासलगाव बाजारसमितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
आज विंचूर बाजारसमितीत सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याला कमीत कमी १२००, जास्तीत जास्त २५००, तर सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटल असा दर होता. दरम्यान दुपारच्या सत्रात तब्बल ७०० नगांची आवक होऊन आज दिवसभरात या ठिकाणी एकूण १९०० नग अशी विक्रमी आवक झाली आहे.
विंचूर बाजारसमितीत कांदा लिलाव व्यवस्थित सुरू असून येथे येणाऱ्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा लिलावासाठी उपबाजारसमिती कटिबद्ध असल्याचे बाजारसमितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले.
दरम्यान जळगाव, सोलापूर, साक्री, सोलापूर येथे लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे, तर नागपूर परिसरात पांढऱ्या कांद्याची आवक सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार आज दुपारी ४ पर्यंत राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कांदा आणि इतर शेतमालाचे बाजारभाव असे आहेत.
शेतमाल : कांदा (प्रति क्विंटल दर
कोल्हापूर — 6695 1000 2600 1800
छत्रपती संभाजीनगर — 1792 200 2000 1100
खेड-चाकण — 1000 1000 2400 1800
हिंगणा — 2 2100 2100 2100
कराड हळवा 150 1500 2300 2300
सोलापूर लाल 17576 100 3100 1600
जळगाव लाल 784 1000 2250 1750
नागपूर लाल 1000 1500 2500 2250
साक्री लाल 2235 1000 2350 2000
पुणे -पिंपरी लोकल 10 1600 2400 2000
पुणे-मोशी लोकल 618 1000 2500 1750
सोलापूर पांढरा 420 200 4600 2400
नागपूर पांढरा 580 2500 3500 3250
नाशिक उन्हाळी 2258 700 2400 2200
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा