Agriculture feeder शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार! उपमुख्यमंत्री

Agriculture feeder शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार! उपमुख्यमंत्री

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याकरिता ॲग्रीकल्चर फिडर Agriculture feeder सौरउर्जेवर आणण्यात येणार. त्यासाठी शेतकऱ्यांची पडीक agriculture department जमीन ३० वर्षे शासन भाड्याने घेणार आहे. या जमिनीची मालकी शेतकऱ्याची असेल. त्यामधून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

पाणी फाउंडेशनतर्फे Agriculture feeder ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’चा पुरस्कार वितरण साेहळा रविवारी संपन्न झाला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावर्षी ३० टक्के आणि पुढील 2 ते 4 वर्षांत उर्वरित सर्व फिडर सौरऊर्जेवर Agriculture feeder आणण्यात येतील. हा पहिला प्रयाेग २०१७ साली राळेगणसिद्धीला यशस्वी झालेला आहे. ताे राज्यभर राबविण्यात येणार आहे.

शेतीला  व्यवसायाच्या दृष्टीने पाहून agriculture department नवतरुणांनी शेती व्यवसायाकडे वळावे. यातील समस्यांवर मात करून पुढे जायला हवे. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा.

यावेळी पाणी फाउंडेशनचे संस्थापक व चित्रपट अभिनेते आमिर खान, किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, पद्मश्री पाेपटराव पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये पाणी फाउंडेशनचे ‘राज्यस्तरीय फार्मर कप २०२२’ पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. २५,००,००० प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाने पटकाविला आहे.

Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर

फार्मर कप स्पर्धेतील विजेत्यांची नावे | Agriculture feeder

प्रथम पुरस्कार : परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरूड, जि. अमरावती. रक्कम २५,००,००० रुपये- द्वितीय पुरस्कार : चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर.) रक्कम १५,००,००० रुपये- संयुक्त तृतीय पुरस्कार : जय याेगेश्वर शेतकरी गट, डांगर बुद्रुक, ता. अमळनेर.रक्कम ५,००,००० रुपये- संयुक्त तृतीय पुरस्कार : उन्नती शेतकरी गट, वारंगा, ता. कळमनुरी, जि. हिंगाेली. रक्कम ५,००,००० रुपये

1 thought on “Agriculture feeder शेतकऱ्यांना मिळणार दिवसा १२ तास वीज; पडीक जमीन ३० वर्षे भाड्याने घेणार! उपमुख्यमंत्री”

Leave a Comment