Agriculture Subsidy| काय सांगता? मळणी यंत्रासाठी मिळतं एवढं अनुदान; जाणून घ्या योजना

Agriculture Subsidy| काय सांगता? मळणी यंत्रासाठी मिळतं एवढं अनुदान; जाणून घ्या योजना

Agriculture subsidy| केंद्र शासनाचं एक चांगलं उद्दिष्ट आहे. जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं. त्यासाठी केंद्रा शासनानं अनेक पावलं उचलली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पारंपारिक शेतीपासून ते शेतीच्या यांत्रिकीकरणाकडे जाणं. यासाठी केंद्रानं कृषी यांत्रिकीकरण अशी योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे.

मात्र केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणामध्ये कृषी अवजारांचा पुरवठा होताना दिसत नाही. तसेच यातून मिळणाऱ्या निधीतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 18 मे 2018 या रोजी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण ही योजना चालू करण्यात आली होती. या योजनेतूनच मळणी यंत्रासाठीही (Thresher) अनुदान देण्यात येतं आहे.

हे पण वाचा: नमो शेतकरी महासन्मान योजना! मे अखेर मिळणार 2,000 रुपये, यासाठी काय करावं लागणार, वाचा सविस्तर

काय आहे योजना | Agriculture Subsidy

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 80% शेतकरी हे अल्प आणि अत्यल्प भूधारक आहे. सहाजिकच त्यांचं उत्पन्नही कमीच आहे. त्यामुळे कमी उत्पन्नामध्ये यंत्रांच्या साहाय्यानं शेती करणं अवघड होत आहे. तसेच वेळेवर मजूर सुद्धा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हा त्रास कमी व्हावा याकरिता सरकार त्यांना अनुदानं आणि अनेक सवलती देत आहे. असंच अनुदान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मळणी यंत्रासाठी त्यांना दिलं जात आहे.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेमार्फत 50% अनुदान मिळतं आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळतं आहे. मळणी यंत्राच्या अनुदानात त्या यंत्राच्या ताकदीनुसार बदल होत असतो.

हे पण वाचा: jandhan Account केंद्र शासनाची ४७ कोटी लोकांना भेट! मिळणार 10,000 रुपये

एवढं मिळणार अनुदान (Subsidy)

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती यांना पुढीलप्रमाणे अनुदान देण्यात येतं. | Agriculture Subsidy

  • 4 टन प्रति टना पेक्षा जास्त क्षमता असलेल्या व 35 बीएचपी (BHP) पेक्षा जास्त मोठं असलेल्या मळणी यंत्राला 2 लाख 50 हजार रुपये एवढं अनुदान मिळतं.
  • 4 टन प्रती घंट्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या मळणी यंत्राला 80,000 रुपये एवढं अनुदान दिलं जात आहे.

आवश्यक असणारी कागदपत्रे (Documents)

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पुढील कागदपत्रांची आवश्यकता लागते. आधार कार्ड, 7/12 व 8 अ उतारा, जातीचा दाखला, बँक पासबुक, यंत्राचे कोटेशन, यंत्राचा परीक्षण अहवाल लागतो.

असा करा अर्ज | Agriculture Subsidy

हा अर्ज महाडीबीटी फार्मर स्कीम (Mahadbt farmers scheme) या वेबसाईटवर करता येईल. या वेबसाईटवर सुरुवातीला ‘शेतकरी योजना'(Farmers scheme) हा पर्याय निवडून वैयक्तिक लाभार्थी या पर्यायावर जाऊन हा अर्ज करु शकता.

Leave a Comment