Apla Davakhana: १ मे पासून राज्यात मोफत येतोय ‘आपला दवाखाना’; जाणून घ्या फायदे

Apla Davakhana: १ मे पासून राज्यात मोफत येतोय ‘आपला दवाखाना’; जाणून घ्या फायदे

Apla Davakhana | राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना नवनवीन अनेक सुखसुविधा पायाशी आणून ठेवलेल्या आहेत. अशामध्येच आता नागरिकांसाठी आणखीन एक आनंददायी बातमी समोर आली आहे. आता राज्यामध्ये १ मे पासून हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray) ‘आपला दवाखाना’ (Apla Davakhana) राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार आहे. यामधील २७ दवाखाने हे संभाजीनगरमध्ये उभारले जाणार आहेत.

Apla Davakhana: अशातच निःशुल्क औषधी उपचार, मलमपट्टी, वैद्यकीय तपासणी अशा प्रकारच्या १४७ चाचण्यांची सेवा मोफत दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयावरही आता तासंतास उभा राहाण्याची आवश्यकता नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या आधारे महाराष्ट्रामध्ये ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राज्यात राबवण्यात येणार आहे. यामुळे राज्यामध्ये एकूण ७०० दवाखाने उभा केले जाणार आहेत.

शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना छोट्या – मोठ्या आजारांसाठी लांब दवाखान्यामध्ये जावं लागतं. मग ही मंडळी सरकारी दवाखान्यांमध्ये धाव घेतात. मात्र यावेळी अधिकाधिक गर्दी असते, उपचाराला उशीर होणे, प्रवासाचा खर्च व सरकारी हॉस्पिटलमध्ये ताण तणाव हा ज्याचा थेट विभाग आयसीयू, अपघात विभाग, आयसीयू प्रसूती विभाग याच्याशी संबंध असतो. यामुळे हे टाळावे याकरिता ‘आपला दवाखाना’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

या ठिकाणी उभारण्यात येणार आपला दवाखाना | Apla Davakhana

‘आपला दवाखाना’ ही योजना जिल्हा आणि तालुक्यामध्ये १५ ठिकाणी, तसेच महापालिका ठिकाणी १२ व छावणी परिसरात २, अशा २९ ठिकाणी राबवली जाणार आहे.

यावर उपचार सुरू

या दवाखान्यामध्ये असंसर्गिक रोग नियंत्रण, दररोज रुग्ण तपासणी, लसीकरण, माता बाल संगोपन ई. उपचार केले जातील. रक्त, लघवी तपासणी या ठिकाणी केली जाईल. तसेच बाह्यरुग्ण विभागाची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

हे कर्मचारी असतील

या दवाखान्यामध्ये परिचारिका, वैद्यकीय अधिकारी असतील. तर कर्मचाऱ्यांचे वेतन हे राष्ट्रीय आरोग्याच्या अभियान निधीतून उपलब्ध केले जाणार आहे. तालुक्याच्या नगरपंचायत, नगरपालिकेमध्ये हे दवाखाने उभारले जाणार आहेत.

Leave a Comment