Approved water supply plan: महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला असून, या मिशनअंतर्गत राज्यातील ३8 हजार गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई 55 लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी 22 हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली आहे.
Approved water supply plan

हे पण वाचा: ST Bus News: आज पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, परिपत्रक निर्गमित
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, या योजना 30 वर्षासाठीच्या कालावधीसाठी असून जिथे शक्य असेल. तिथे या योजना सौर ऊर्जेवर सुरू करणार आहोत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योजनेच्या पायाभूत सुविधांच्या भांडवली किंमतीच्या 10 टक्के एवढी लोकवर्गणी गोळा करण्यात येते व ती ग्रामपंचायतीच्या खात्यात असते. तर डोंगराळ किंवा वन भागामध्ये आणि अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या असलेल्या क्षेत्रासाठी किमान 5 टक्के लोकवर्गणी गोळा करण्यात येत आहे. या लोकवर्गणीची रक्कम आर्थिक, वस्तुरूपात किंवा श्रमदानाच्या स्वरूपात अदा करायची आहे. तथापि लोकवर्गणी न भरल्यामुळे कोणतंही काम थांबवलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.