Cabinet Decision
Cabinet Decision | राज्य शासनाकडून वेळोवेळी आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेत असतात. यानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Decision) बैठक पार पडली आहे. त्यावेळी राज्यांतील शाळांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी (Agriculture) महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Cabinet Decision) काय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले. मंत्रीमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण शासन निर्णय पहा.
- पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी 397 कोटी 54 लाख देण्यात येणार आहे. तसेच जेजुरी तीर्थक्षेत्रासाठी 127 कोटी 27 लाख तसेच सेवाग्राम विकासासाठी 162 कोटींच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्यात येईल. यासंदर्भात अध्यादेश काढला जाणार आहे.
राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित केल्या जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी घेतले महत्वपूर्ण निर्णय धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. 1 हजार कोटी निधीस मान्यता दिली असून, त्याचा 5 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला.
7 हजार 690 हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या कामांना गती दिली जाणार आहे. सुमारे 787 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता 7690 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.