लिपिक-लघुलेखक-निर्देशक पदांची मोठी भरती, लगेच अर्ज करा

तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिपत्याखालील विविध कार्यालयांमध्ये “गट क” मधील रिक्त पदांसाठी जाहिरात

 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :

 

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक दि. ३१/०८/२०२३ सकाळी ११ पासून

 

  • ऑनलाईन पध्दतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दि. २२/०९/२०२३ रात्री ११.५९ पर्यंत

 

पद आणि पदसंख्या

 

लघुलेखक निम्न श्रेणी 06

वरिष्ठ लिपिक 29

निर्देशक (प्रयोगशाळा सहाय्यक) तांत्रिक 07

पद आणि शैक्षणिक पात्रता

 

लघुलेखक निम्न श्रेणी (१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

(२) मराठी लघुलेखनाचा वेग किंमान १०० शब्द प्रति मिनीट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किंमान ३० शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

 

वरिष्ठ लिपिक (१) कला किंवा वाणिज्य किंवा विज्ञान किंवा कायदा या कोणत्याही मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणुन घोषीत केलेली अन्य कोणतीही अर्हता.

२. संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखनात किमान ३० शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे आणि इंग्रजी टंकलेखनात किमान ४० शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र

३. किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर कोणत्याही उद्योगात किंवा औद्योगिक उपक्रम किंवा व्यावसायिक संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा महामंडळे किंवा शासनाने स्थापन केलेल्या मंडळामध्ये प्रशासन किंवा लेखा विषयक कामाचा किंमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव.

 

निर्देशक (प्रयोगशाळा सहाय्यक) तांत्रिक (१) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेली महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी किंवा अणुविद्युत व संचरण अभियांत्रिकी किंवा संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी किंवा रसायन अभियांत्रिकी किंवा रसायन तंत्रज्ञान किंवा उपकरणीकरण अभियांत्रिकी किंवा औद्योगिक अणुविद्युत अभियांत्रिकी किंवा स्वयंमचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका परीक्षा उत्तीर्ण.

(२) शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी, संस्था किंवा आस्थापना किंवा शासन अंगीकृत, महामंडळामधील प्रयोगशाळा सहाय्यक किंवा साईट सुपरवायजर पदावर किंवा त्याने धारण केलेल्या पदविकेच्या विद्याशाखेशी संबंधीत मॅन्युफॅक्चरिंग किंवा सव्हिसींग किंवा किंवा सीएनसी मशीन हाताळण्याचा रोजंदारी किंवा कार्यव्ययी किंवा करार पध्दतीवर किंवा मानधन इत्यादी स्वरुपात पूर्णवेळ कामाचा १ वर्षाचा अनुभव.

 

इतर सविस्तर माहिती पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करावी

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

 

अर्ज करण्यासाठी मोबाईल मध्ये लिंक ओपन न झाल्यास मोबाईल रोटेट कराव येथे करा येथे क्लिक करा

 

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Leave a Comment