Cotton Rates | कापसाला भाव का मिळत नाही? जाणून घ्या कारण..!

Cotton Rates | कापसाचे उत्पादन कमी होऊन देखील सध्या कापसाचे दर दबावामध्ये का आहेत. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी कापसाची आवक 5 पटींनी जास्त आहे. पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. या वर्षी कापूस Cotton Rates उत्पादन कमी आहे. त्यामध्ये कापूस तयार होऊन 7 महिने झाले आहेत. तरीदेखील कापसाचे भाव कमीच दिसत आहेत.

Cotton Rates कापसाची आवक वाढली

मार्च महिन्यापासून बाजारात कापसाची आवक वाढली आहे. याआधी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. मात्र दराच्या आशेने मार्च मध्ये कापूस बाजारात विकायला आणला. यामुळे या हंगामातील उचांकी आवक मार्च महिन्यापासून सुरु झाली आहे. याचा परिणाम कापूस दरावर झाला आणि कापसाचे दर आणखी कमी होत चालले.

आंतरराष्ट्रीय बाजारावर होतोय परिणाम

जागतिक कापूस बाजारामध्ये भारताला एक महत्वाचे स्थान आहे. भारतामध्ये कापूस भाव घटल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर (International Market) दिसतोय. यावर्षी सध्याची कापसाची बाजारातील आवक १,१०,००० गाठींच्या दरम्यान आहे. मागच्या वर्षी या महिन्यामध्ये २०,००० गाठींपेक्षा कमी होती. म्हणजे यंदाची कापसाची आवक ५ ते ६ पटींनी वाढलेली आहे. मागच्या वर्षी या महिन्यात कापूस चांगला तेजीत होता.

म्हणून आवक वाढली

सध्या महाराष्ट्र व इतर राज्यांमधल्या कापूस उत्पादक भागात अवकाळी पाऊस पडतोय. यामुळे शेतकऱ्यांना कापूस साठवून ठेवायला अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी तर कापूस ओला होऊन नुकसान सुद्धा झाले आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला आहे. त्यामुळे बाजारात कापसाची आवक वाढताना दिसत आहे.

शेतकरी आर्थिक कोंडीत

सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७,७०० ते ७,९५० रुपयांचा भाव परभणी व वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव मिळाला. आधीच नैसर्गिक संकटांमुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामध्ये कापसाला अपेक्षित दर सुद्धा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीमध्ये सापडले आहेत.

Leave a Comment