Crop Damage: अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF च्या नव्या निकषानुसार मिळणार मदत, जाणून घ्या

Crop Damage: अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF च्या नव्या निकषानुसार मिळणार मदत, जाणून घ्या

Crop Damage | राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली शेती पिके (Crop Damage) अवकाळी पावसाने झोपल्यामुळे आणि गारपिटीमुळे अक्षरशः भुईसपाट झाली आहे. याच अवकाळी पावसामुळे (Crop Damage) नुकसान झालेले शेतकरी हवालदार झाले आहे. याच शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी माहिती मिळाली आहे. चला तर मग सविस्तरपणे याबाबत माहिती पाहूयात.

किती क्षेत्रावर झाले नुकसान? Crop Damage

महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे तब्बल 1,370 हेक्टर रब्बी हंगामातील शेतीतील पिके आणि फळबागांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. अशातच यावर्षी देखील शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे झालेले आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार नव्या निकषानुसार मदत

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यापेक्षा अधिक (Crop Damage) नुकसान झाले आहे, असे शेतकरी या मदतीसाठी पात्र असणार आहेत. यानुसार राज्यामधील 2,663 शेतकऱ्यांना 1,369 क्षेत्रासाठी NDRF च्या नव्या निकषानुसार मदत दिली जाणार आहे.

किती मिळणार मदत?

नवीन NDRF च्या निकषानुसार रब्बीच्या जिरायती पिकांसाठी 8,700 रुपये हेक्टर, बागायती पिकांना 17,000 रुपये हेक्टर व फळपिकांना 22,500 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment