Crop damage compensation अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून देत असते. पण या भरपाईमध्ये आता कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मागच्या वर्षी ठरवण्यात आलेल्या या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. प्रतिहेक्टरी संवर्गनिहाय दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
किती होती नुकसान भरपाई | Crop damage
नुकसान भरपाई तीन संवर्गानुसार देण्यात येत असते. यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिके यानुसार प्रतिहेक्टरी भरपाई देण्यात येत असते. जून 2022 पूर्वी बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये, जिरायती पिकांसाठी 6,800 रुपये आणि फळबागांसाठी 18,000 एवढी भरपाई मिळत होती. कमाल 2 हेक्टर पर्यंत ही रक्कम दिली जात होती. या रकमेमध्ये गतसाली 2 पट वाढ करण्यात आली होती.
हे पण वाचा: Crop Loan: शेतीसाठी तब्बल 3 लाखांपर्यंत मिळतंय बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या कधीपासून होणारं वाटप सुरू
आता काय होणार
सरकारने गतसाली भरपाईच्या रकमेमध्ये 2 पटीने वाढ केली होती. तसेच नुकसान झालेल्या क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टर पासून 3 हेक्टरवर गेली होती. मात्र ही नवीन वाढ केवळ जून ते ऑक्टोबर 2022 या 5 महिन्यांसाठी लागू होती, असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Crop damage
या जिल्ह्याला बसणार फटका
पुणे जिल्ह्यामध्ये मार्च 2023 मध्ये 2 दिवस अतिवृष्टी झाली होती. यावेळी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील जवळपास 400 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं होतं. याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता फक्त 70 लाख रुपये मिळणार आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा अहवाल तयार केला आहे. Crop damage
असे आहेत नवीन दर
नुकसान भरपाईचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्या दरांनुसार जिरायती पिकांना 8,500 रुपये, बागायती पिकांना 17,000 रुपये व फळ पिकांना 22,500 रुपये भरपाई देणार आहे. तसेच कमीत कमी भरपाई ही जिरायती पिकांसाठी 1,000 रुपये, बागायती पिकांसाठी 2,000 रुपये आणि फळ पिकांसाठी 2.500 रुपये एवढी आहे.