Crop Damage: या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरु

Crop Damage: या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरु

Crop Damage: गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा फटका बसला होता. थेट शेतीतील पिक उत्पादनावर (Crop Damage) याचा परिणाम झालता. यामुळे शेतीतील माल कमी निघाला आहे. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे (Crop Damage) नुकसान झाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती.

अतिवृष्टी भरपाईची घोषणा

सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेऊन 17 नोव्हेंबर 2022 रोजी जालना जिल्ह्यासाठी मदतीची घोषणा करण्यात आलती. याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी निधीची घोषणा करण्यात आली होती.

हे पण वाचा: Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर

किती निधी झाला मंजूर?

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त जालना जिल्ह्यातील 3,69,000 रुपये शेतकऱ्यांसाठी 397 कोटी 73 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. आता याच निधीचे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 1,286 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

कोणाला मिळणार मदत? Crop Damage

जालना जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणार आहे. 24 तासांमध्ये 63 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेल्या व 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच या मदतीचा लाभ मिळणार आहे.

Leave a Comment