Maha DBT Gov Subsidy शेतकऱ्यांसाठी महत्वाचं! कोणत्या योजनेत किती अनुदान मिळतं घ्या जाणून

आपले सरकार महाडीबीटी’ dbt Gov Subsidy हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील उत्तम उत्पादनासाठी कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य स्वरूपात यामार्फत dbt Gov अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवर केवळ एक अर्ज सादर केल्यास शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेता येतो.

राज्य शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटवर शेतकरी dbt Gov राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय अथवा आपल्या तालुक्यातील कृषी dbt Gov सहायक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील माहीतीनुसार योजना व अनुदान: dbt Gov Subsidy

Maha DBT Gov Subsidy शेतकऱ्यांसाठी महत्वाचं! कोणत्या योजनेत किती अनुदान मिळतं घ्या जाणून

▪️ प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना -प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन घटक) या योजनेतंर्गत ठिबक संच, तुषार संच हे 45 टक्के व 55 टक्के या अनुदान प्रमाणात उपलब्ध करुन दिले जातात. | dbt Gov Subsidy

▪️ कृषि यांत्रिकीरण उप-अभियान योजनेतंर्गत ट्रॅक्टर व इतर औजारे व यंत्रे यांच्या खरेदीसाठी 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.

▪️ राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व इतर औजारे व यंत्रे यांच्या खरेदीसाठीही 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.

▪️ राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यांत्रिकीकरण, विहीर, कांदाचाळ, संरक्षित शेती यासाठी 40 टक्के ते 60 टक्के अनुदान दिले जाते.

▪️ राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य, गळीतधान्य, कापूस ) या योजनेंतर्गत बी-बियाणे, यंत्र व अवजारे यांच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.

▪️ मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत ठिबक सिंच व तुषार संच यांच्या खरेदीसाठी 25 टक्के व 30 टक्के अनुदान दिले जाते.

▪️ एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदाचाळ, पॅक हाऊस , पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस, शेततळे अस्तरीकरण या कामांसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.

▪️ भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, शोभिवंत फुलझाडे यांच्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते.

Leave a Comment