Farmer compensation Fund गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने केला निधी मंजूर, ‘या’ जिल्ह्यांना मदत जाहीर

Farmer compensation fund | राज्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पावसानं धडाका लावला होता. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह राज्यामधील सर्वच भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये फळबाग आणि अन्य शेती पिकांचं मोठे नुकसान झालेलं आहे. दरम्यान, राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिंदे सरकारनं प्रशासनाला आदेश दिले होते. त्याबाबत निधी वितरणाचा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे. दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. 9 जिल्ह्यातील बाधित झालेल्या 41,476 नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या निधीचं वाटप करण्यात येणार आहे.

काय आहे निर्णय | Farmer compensation Fund

राज्यामध्ये मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या पावसाने नुकसान झालेल्या भरपाईसाठी राज्य सरकारकडून 27 कोटी 18 लाख रुपयांच्या मदतीचं वाटप करण्यात येणार आहे. दिनांक ४ ते ८ मार्च व दिनांक १६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अवकाळी पाऊस ही राज्य शासनानं आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेतीपिकांचं नुकसान झालेलं असल्यास जेवढ्या शेती पिकाच नुकसान झालं आहे. तेवढ्या क्षेत्राकरता शेतकऱ्यांना मदत वाटप होणार आहे.

या जिल्ह्यांना निधी | Farmer compensation Fund

या निर्णयांतर्गत राज्यामधील अनेक जिल्ह्यांना निधी मंजूर झालेला आहे. यामध्ये नागपूर विभागातील गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. व कोकण विभागातील रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासाठी 27 कोटी 18 लाख रुपये एवढा निधी मिळालेला आहे.

जिल्हानिहाय निधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment