Farmers Scheme | अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी नवी योजना लागू, याअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ‘इतका’ लाभ; जाणून घ्या सविस्तर

Farmers Scheme | शेतकऱ्यांसाठी सुरु असलेली शेतकरी अपघात विमा योजना बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्याऐवजी आता 19 एप्रिल 2023 पासून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे. जुनी शेतकरी अपघात विमा योजना Farmers Scheme विमा कंपन्यांकडून पूर्णपणे राबवली जात नव्हती. दावे वेळेत मंजूर न करणं, काहीतरी त्रुटी काढून दावे नाकारण्याचे प्रकार घडत होते. कृषी खात्याचे म्हणणं होतं. म्हणून राज्य शासनानं शेतकरी अपघात विमा योजना बंद करून अनुदान योजना चालू केली आहे. मात्र शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी सुरु असलेल्या विमा योजनेचा लाभ घेतल्यास नवीन योजनेचा लाभ घेता येत नाही.

काय होती जुनी योजना | Farmers Scheme

जुन्या विमा योजने अनुसार अपघातग्रस्त शेतकऱ्याला अथवा त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात होती. त्यासाठी स्वतः खातेदार शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य म्हणजेच आई-वडील, Farmers Scheme शेतकऱ्याची पत्नी-पती, मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी एक अशा घरातील एकूण दोन व्यक्तींना मागील 5 वर्षांपासून विमा सुरक्षा दिली जात आहे. मात्र विमा कंपनी ही योजना व्यवस्थितपणे राबवत नाहीत, असं कृषी विभागानं म्हटलं आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्रास देत असल्यामुळं नवीन अनुदान योजना लागू करण्यात आली आहे.

हा मिळणार लाभ | Farmers Scheme

अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये तर अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यावर 2 लाख रुपये या अनुदान योजनेमार्फत मिळणार आहेत. तसंच अपघातामुळं एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 2 लाख रुपये दिले जाणार. अपघातामुळं एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये या योजने मार्फत देण्यात येणार आहेत. नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या इत्यादी कारणांसाठी या योजनेचा फायदा घेता येणार नाही. अपघात घडल्यानंतर 30 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून त्वरित मदत देण्याची कार्यवाही तालुका स्तरीय समितीद्वारे केली जाईल.

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेली कारणे | Farmers Scheme

शेती व्यवसाय करतांना, नैसर्गिक आपत्ती, विज पडणे, पुर यासोबतच विजेचा झटका बसणे, सर्पदंश, विंचुदंश, रस्त्यावरील वाहन अपघात, जनावरांने चावल्याने किंवा हल्ला केल्याने, खून झाल्यास, दंगलीत मृत्यू झाल्यास तसेच अन्य कोणत्याही अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ या अपघात विमा योजनेअंतर्गत देण्यात येतो.

परंतू विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंधन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, भ्रमिष्टपणा, बांळतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून झाल्यास या कारणास्तव विमा संरक्षण लागू होत नाही.

विमा दावा करण्यासाठी आवश्यक घटक आणि कागदपत्रे | Farmers Scheme

महसूल नोंदीनुसार 7/ 12 उताऱ्यावर नावाचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील सर्व महिला किंवा पुरुष शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. शेतकऱ्यांच्या वतीने विमा हप्त्याची रक्कम शासन विमा कंपनीस अदा करत असते.

योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अपघातात अपंगत्व आल्यास शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनी विहीत नमुन्यातील दाव्यासाठीचा अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्जासोबत शेतकरी म्हणून अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला 7/12 उतारा, ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड), शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाठी यांच्याकडील गाव नमुना नं.6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र हे कागदपत्रे मुळ स्वरुपात सादर करावेत.

तसेच शेतकऱ्याचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, राजपत्रित अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले ग्रामपंचायत प्रमाणपत्र, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण भरलेला दाव्यासाठीचा अर्ज क्षेत्रिय कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

भरपाईची रक्कम आणि कालावधी

विमा कंपनीकडून दावे सादर केल्याच्या दोन महिन्याचा आत निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या किंवा वारसदारांच्या बचत खात्यात जमा केले जातात. यात शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे 2 डोळे निकामी झाल्यास, 2 अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. अपघामुळे एक डोळा निकामी झाल्यास किंवा एक अवयव निकामी झाल्यास 50 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात येते.

तसेच विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्याबाबत विमा कंपनीकडून पत्राद्वारे अर्जदारास कळविण्यात येते. विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत काही वाद उद्भवल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियंत्रण समिती निर्णय घेते. विमा दावा विवादास्पदरित्या नामंजूर झाला असल्यास अर्जदार या समितीकडे तक्रार दाखल करू शकतात.

Leave a Comment