Farm: शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीतून मिळणारं भरघोस उत्पन्न; सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा घ्या लाभ, जाणून घ्या पात्रता

Farm: शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीतून मिळणारं भरघोस उत्पन्न; सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा घ्या लाभ, जाणून घ्या पात्रता

Farm: शेतीसाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागत असते. पण, पाण्याचा मोठा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड होत आहे. म्हणून शेतीसाठी शेतकऱ्यांना पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी शेततळे फायद्याचे ठरते. तर शेतकऱ्यांना या शेततळ्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. शासन शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी (Farm) किती अनुदान देते, काय अटी आहेत हे जाणून घेऊयात.

मागेल त्याला शेततळे

राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ (Magel Tyala Shettale) योजना राबवण्यात येते. ज्या ठिकाणी पाणी कमी आहे. अशा ठिकाणी शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेततळे (Farm) करू शकतात. यामधून शेतकऱ्यांना नक्कीच शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. राज्यामधील जवळजवळ 80% शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे सिंचना-अभावी शेती उत्पादनामध्ये घट होत आहे. यामुळेच राज्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजना (Farm Subsidy) राबवण्यात येत आहे.

हे पण वाचा: Crop Loan: शेतीसाठी तब्बल 3 लाखांपर्यंत मिळतंय बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या कधीपासून होणारं वाटप सुरू

काय आहे पात्रता? | Farm

  • शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • क्षेत्र धारणेस कोणतीही कमाल मर्यादा नाही.
  • महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे एकत्रित सोडतीमध्ये निवडीचा निर्णय घेण्यात येतो.
  • उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ मिळतो.
  • शेततळ्यासाठी कमी पाझराची जमीन निवडा.
  • टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य, तीन टक्क्यांपेक्षा कमी जमिनीच्या उतार पद्धतीची असणे आवश्यक आहे.
  • शेततळ्यासाठी मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र, दलदलीची, चिबड जमीनिची निवड केऊ नये.

किती अनुदान मिळते?

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 14,433 रुपयांपासून 75,000 रुपयांपर्यंतच्या मर्यादेत अनुदान देण्यात येते. हे अनुदान शेततळ्याच्या आकारमानानुसार मिळते. जर शेततळ्याचा आकार 15× 15 × तीनपासून 34 × 34 × तीन मीटर एवढा असू शकतो. जर शेतकऱ्यांना जास्त आकारमानाचे शेततळे घ्यायचे असेल तर त्यासाठी लागणारा उर्वरित खर्च सदर शेतकऱ्याला करावा लागत असतो.

Leave a Comment