Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसानीमुळे शिरूर तालुक्यातील अधिसूचित पीकविमा ( Crop ) क्षेत्रातील मूग आणि उडीद पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स ( insurance ) विमा कंपनी, मुंबई यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
तीव्र दुष्काळ स्थिती, पावसाचा दीर्घ खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट/वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत), पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत), मोठ्या प्रमाणात कीड-रोग यांचा प्रादुर्भाव (पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव) व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणे या प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे नुकसान भरपाईबाबत अधिसूचना लागू करण्याची तरतूद आहे. Crop Insurance
पर्जन्यातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त तफावत) या प्रातिनिधीक सूचकाच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार मूग व उडीद पिकाचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सदर महसूल मंडळ गटातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम १ महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मूग पिकाच्या अनुषंगाने शिरूर, निमोणे, रांजणगाव गणपती महसूल मंडळ गटामध्ये मागील ७ वर्षाची सरासरी उत्पादकता ४५४.८ किलो प्रतिहेक्टरी असून संयुक्त सर्वेक्षणानुसार ४२.९४ किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत सुमारे ९०.५९ टक्क्याची घट दिसून येत आहे.
टाकळी हाजी, मलठण महसूल मंडळ गटात ४१६.९६ किलो प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत संयुक्त सर्वेक्षणानुसार ४६.१० किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित असून सरासरी उत्पादनाच्या तुलनेत सुमारे ८८.९४ टक्क्यांची घट दिसून येत
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा