Today News आपल्या बँक खात्यावर अचानक मोठी रक्कम जमा झाली, तर साहजिकच कोणीही प्रथम बँकेत धाव घेतो. असाच प्रकार ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात घडला. ओडिशा ग्राम्य या सरकारी बँकेच्या अनेक ग्राहकांच्या खात्यांवर अचानक 30 हजार ते 2 लाखांपर्यंतची रक्कम जमा झाली. त्याचा संदेश मोबाईलवर मिळताच संबंधित ग्राहकांनी बँकेच्या शाखेत ते पैसे काढण्यासाठी धाव घेतली.
अनेकांनी पैसे काढल्यानंतर बँक व्यवस्थापनास संशय आला. त्यांनी तातडीने पैसे काढण्यास मनाई करीत याबाबतची चौकशी सुरू केली. तीनशे खात्यांची तपासणी केली; मात्र हे पैसे नेमके कोणी ग्राहकांच्या खात्यांवर टाकले. हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत काही पैसे ग्राहकांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. हे कसे झाले, आम्हालाही माहिती नाही. शाखेत दोनशे ते अडीचशे ग्राहक पैसे काढण्यासाठी आले होते. काहींच्या खात्यांवर दोन लाखांपर्यंतची रक्कम जमा झाली असून, हे पैसे नेमके कोठून आले, याची शहानिशा केली जात आहे. Today News
अहवालानुसार, ओडिशा ग्राम्य बँक ही एक सरकारी बँक आहे जी ओडिशात खूप लोकप्रिय आहे. या बँकेच्या देशात ५४९ शाखा असून १५५ एटीएम आणि २३४० कर्मचारी आहेत. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे ५५ लाखांहून अधिक ग्राहक आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा