Firtilizer | मोठी बातमी! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Firtilizer | शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन (production) मिळविण्यासाठी नवनवीन खतांचा वापर करून पहात असतात. पण खतांचा वापर प्रमाणित करणेही तितकेच महत्वाचे आहे. काही खते जी शेतकऱ्यांनी वापरू नये, असे सांगता कृषी विभागाने (Department of Agriculture) दिली आहे.

याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते ( Firtilizer ) खरेदी करण्याचा विचार करत असताल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. आता कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने त्या कंपन्यांच्या खतावर बंदी घातली आहे. हे खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून (Agriculture Department) करण्यात आले आहे.

Firtilizer News

खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुन्याच्या तपासणी घेण्यात आल्या होत्या. यामधील 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत (Fertilizer) विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली.

शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नका, असे आवाहन सुद्धा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, सायन्स केमिकल्स नाशिक, एस एस पी के पी आर, ऍग्रो केम, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, यासोबतच विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आले.

त्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.कोणती खते का वापरू नयेखतांमधील इनग्रेड (Ingred) हे कमी झाल्याने ते अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांची खरेदी करू नका, असे आवाहन देखील करण्यात आले.

दरम्यान, या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अप्रमणित झालेल्या खतांचा काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झालेले आहे.

Leave a Comment