Free Electricity | जालना जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेची अंमलबजावणी चालू झाली आहे. या योजनेमार्फत जिल्ह्यातील ७० उपकेंद्रांवर ३१३.२१ मेगावॅट एवढ्या क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पांसाठी जिल्हा प्रशासनाने सरकारी जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी त्यांची जमीन भाड्याने देण्यास तयार आहे, असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. या योजने मार्फत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी प्रतिवर्ष सुमारे १,२५,००० रुपये इतके भाडे मिळणार आहे.
जालना जिल्ह्यामध्ये २१ उपकेंद्रांवर सौर ऊर्जा (Free Electricity) प्रकल्प उभारण्याचा पहिला टप्पा शासनाने सुरू केलेला आहे. या टप्प्यात १७०.३ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार असून, या प्रकल्पांसाठी जिल्हा प्रशासनाशी ९०८.७४ एकर जमिनीचे करार करण्यात आले आहेत. उर्वरित उपकेंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अजुन १३ प्रस्ताव प्रलंबित आहेत. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
हे पण वाचा: PM Kisan kyc list: किसान 16 वा हप्ता E-KYC यादी जाहीर नाव असेल तरच मिळणार 2000 रुपये
Also Read
या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा होईल. त्यामुळे शेतीच्या कामाला लवकर चालना मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ सुद्धा होईल. तसेच, सौर ऊर्जेचा वापर वाढून पर्यावरण रक्षण होण्यास देखील मदत होईल. (Free Electricity)
योजनेचे फायदे
- शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होईल.
- शेतीच्या कामाला चालना मिळेल.
- शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल.
- सौर ऊर्जेचा वापर वाढून पर्यावरण रक्षण होण्यास देखील मदत होईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
1 thought on “Free Electricity | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून मिळणार दिवसा वीज; जाणून घ्या सविस्तर”