Gold Price Today | मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी आली. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. गेल्या काही तासांत सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचा भाव गगनाला भिडला. म्हणूनच ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी आजच्या सोन्या-चांदीच्या किमती तपासून पहाव्यात.
शुक्रवारी गुड रिटर्ननुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 60,250 रुपयांवर होता. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,730 रुपयांपासून सुरू होते. MCX च्या मते, 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत $60,250 वर व्यापार करत आहे. तसेच 10 ग्रॅममधील 24 कॅरेट सोन्याचा दर 65,730 रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे (Gold Price Today) लग्नाच्या हंगामात ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.
सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 60,250 रुपये
मुंबई – 60,250 रुपये
नागपूर – 60,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 65,730 रूपये
मुंबई – 65,730 रूपये
नागपूर – 65,730 रूपये
चांदीचे आजचे भाव
या काळात केवळ सोन्याचे भावच (Gold Price Today) वाढले नाहीत तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून आज 10 ग्रॅम चांदीचा दर 755 रुपयांवर आहे. शिवाय, 100 ग्रॅम चांदीची किंमत 7,550 रुपये आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 रुपये आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्या-चांदीच्या दरात घट होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.