Gold Prices गणेशोत्सवानंतर ३० सप्टेंबरला सकाळी १०.२६ वाजता नागपुरात सोन्याचे दर घसरून केवळ ५७ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्रामवर खाली घसरले.
नागपूर : गणेशोत्सवात नागपूर जिल्ह्यात सोन्याच्या दरात बऱ्याचदा चढ-उतार बघायला मिळाला. परंतु गणेशोत्सवानंतर ३० सप्टेंबरला सकाळी १०.२६ वाजता नागपुरात सोन्याचे दर घसरून केवळ ५७ हजार ८०० रुपये प्रति दहा ग्रामवर खाली घसरले.
नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ३० सप्टेंबर २०२३ रोजी येथे प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५४ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३७ हजार ६०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७० हजार ३०० रुपये होते. हे सोन्याचे दर २५ सप्टेंबर २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ६०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७३ हजार ५०० रुपये होते. हे सोन्याचे दर १९ जुलै २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार १०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५७ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४८ हजार १०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७६ हजार ४०० रुपये होते. या वृत्ताला नागपुरातील रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी दुजोरा दिला