मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला ‘या’ अटी! एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1,600 कोटींचा पहिला हप्ता

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला ‘या’ अटी! एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1,600 कोटींचा पहिला हप्ता

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी

सोलापूर: प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेवर मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. त्यानुसार कामकाज सुरु झाले असून एप्रिलनंतर राज्यामधील ७९ लाख २७ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांप्रमाणे 1,600 कोटी दिले मिळणार आहेत. १ फेब्रुवारी २०१९ आधीची ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे सांगितले आहे.

मुख्यमंत्री सन्मान निधी या योजनेचा लाभ आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल पासून मिळणार आहे. सरकारने कृषी विभागाकडून माहिती संकलित केली आहे. एकाच सातबारा उताऱ्यावरील कुटुंबप्रमुख त्याची पत्नी व १८ वर्षांखालील दोन अपत्य, असे कुटुंब ग्राह्य असल्यास त्यांना प्रत्येकी 2,000 रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत. 1 वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2,000 हजारांप्रमाणे म्हणजे वर्षाला 6,000 हजार रुपये दिले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेचे निकष मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीसाठी सुद्धा लागू असणार आहेत. मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी क्षेत्राची कोणतीही मर्यादा नाही, पण जमीन लागवडीयोग्य असणे, बंधनकारक आहे.

मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला ‘या’ अटी! एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1,600 कोटींचा पहिला हप्ता

हे पण वाचा: Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर

दरम्यान, ज्यांची शेतजमीन १ फेब्रुवारी २०१९ आधीची आहे, पण त्यांनी ई-केवायसी व बॅंक खात्याला आधारलिंक केलेले नाही. तसेच त्यांच्या नावावरील एकूण मालमत्तेची माहिती महसूल विभागाला दिलेली नसल्यास, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना ठराविक दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्या मुदती च्या अगोदर प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना योजनेची गरज नाही, असे ग्राह्य धरून ते अपात्र ठरवण्यात येऊ शकतात, असे कृषी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, केंद्र सरकारचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित झाल्यानंतर पुढील १०-१५ दिवसांत राज्याचा हप्ता जमा होऊ शकतो, असे नियोजन केले जात आहे.

‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ | मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी

Leave a Comment