Incentive Grant 2023: 50,000 अनुदान 5 वी यादी जाहीर, लगेच यादीत नाव पहा

Insentive Grant 2023: नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची माहिती समोर आली आहे. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 50,000 रपुये अनुदान (Insentive Grant 2023) देण्यात येते. या योजनेच्या लाभार्थ्यांची 5 वी यादी प्रकाशित केली आहे. तसेच या योजनेसाठी कोट्यावधींचा निधी वितरित करण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे. यामुळे आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान (Incentive Grant 2023) जमा होण्यास चालू होणार आहे.

शेतकऱ्यांना अनुदान वितरीत | Incentive Grant 2023

हे पण वाचा: Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर

आतापर्यंत प्रोत्साहन अनुदानाच्या 4 याद्या प्रकाशित झालेल्या आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 50,000 अनुदान (Incentive Grant 2023) वाटप करण्यात आले आहे. आता उर्वरित पात्र शेतकरी या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. शेतकऱ्यांसाठी 5 वी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाचा निधी वितरीत करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.

प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आधार ई केवायसी E-kyc करणे बंधनकारक आहे. आधार ई केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल. अनुदानासाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्बल 1,014 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. अखेर हे अनुदान शासनाच्या खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्ही जवळील CSC केंद्रात जाऊन ही यादी पाहू शकता.

Leave a Comment