Ind vs Pak : आशिया कप २०२३ मध्ये भारतानं सुपर फोरमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यांत पावसानं व्यत्यय आणला. पैकी पहिला सामना पावसामुळे वाया गेला. तर दुसरा सामना राखीव दिवसामुळे निकाली निघाला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा तब्बल २२८ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारतानं पाकिस्तानचा सर्वात मोठा पराभव केला. यामुळे सुपर फोरच्या गुणतालिकेतील रंगत वाढली आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा तिसरा सामना चाहत्यांना पाहायला मिळू शकतो. दोन्ही संघ अंतिम सामन्यात भिडू शकतात. आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होईल. आज भारतीय संघ सुपर फोरमधील दुसरा सामना खेळेल. भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान असेल. हा सामना जिंकल्यावर भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवल्यास त्यांचंही अंतिम सामन्यातील स्थान निश्चित होईल. भारत आणि पाकिस्ताननं श्रीलंकेला धूळ चारल्यास पारंपारिक प्रतिस्पर्धांमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना होईल.
वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या भारताचे सुपर फोरमधील दोन सामने शिल्लक आहेत. भारत आणि श्रीलंकेचे संघ आज भिडतील. त्यानंतर बांग्लादेशविरुद्ध १५ सप्टेंबरला सामना होईल. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध १४ सप्टेंबरला होईल.
भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचण्यासाठीचं समीकरण
- भारतानं आज श्रीलंकेचा पराभव केल्यास त्यांचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित. त्यानंतर भारताचा बांग्लादेशविरुद्ध सामना होईल. पण तो केवळ औपचारिकता असेल.
- पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध १४ सप्टेंबरला होईल. अंतिम फेरी गाठायची असेल तर पाकिस्तानसाठी करो या मरोची स्थिती. सामना जिंकावाच लागेल. जिंकल्यास भारताविरुद्ध अंतिम फेरीचा सामना.
- पाकिस्तान वि. श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाल्यास, अपूर्ण राहिल्यास दोन्ही संघांचे प्रत्येकी ३ गुण होतील. मग नेट रनरेट पाहिला जाईल. त्या परिस्थितीत श्रीलंका अंतिम फेरीसाठी पात्र. कारण
- आजच्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव केल्यास भारताला बांग्लादेशला नमवून अंतिम फेरी गाठावी लागेल. पण पाकिस्तानला अंतिम फेरी गाठायची असल्यास श्रीलंकेला मोठ्या फरकानं पराभूत करावं लागेल.