कोणतीही परीक्षा न देता पोस्टात 30 हजार जागांसाठी भरती

India Post Bharti : भारतीय पोस्ट खात्यात नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. भारतीय पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाकसेवक या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. तसेच हे अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ही २३ ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार India Post चं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या indiapostgdsonline.gov.inच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. India Post GDS Bharti 2023 च्या अंतर्गत ३० हजार ४१ पदे भरली जाणार आहेत. जर तुम्हीही भारतीय पोस्ट खात्यामध्ये नोकरी करण्याची इच्छूक असाल, तर खालील गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील.

या भरती प्रक्रियेमधून ३० हजार ४१ ग्रामीण डाकसेवकांच्या पदांची भरती होणार आहे

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्य उमेदवारांची वयोमर्यादा ही १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असली पाहिले.

या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. केंद्र किंवा राज्य सरकारकडून मान्यताप्राप्त असलेल्या कुठल्याही बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र. तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये जीडीएसच्या सर्व अनुमोदित श्रेणींसाठी एक अनिवार्य शैक्षणिक योग्यता असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना अनिवार्य किंवा पर्यायी विषय म्हणून स्थानिक भाषेचं ज्ञान असलं पाहिजे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. मात्र महिला, ट्रान्स-वुमन उमेदवार आणि सर्व एससी/एसटी उमेदवारांना शुल्कामधून सवलत देण्यात आली आहे.

असा करा अर्ज

India Post च्या अधिकृत वेबसाईट असलेल्या indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर जा.

होमपेजवर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.

रजिस्टर केल्यानंतर अर्जासोबत पुढे जा

त्यानंतर उमेदवारी अर्ज शुल्क भरा

आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा

अर्ज जमा केल्यानंतर भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट घ्या.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment