IPL Auction 2023: सॅम करणवर लागली सर्वाधिक बोली, पहा कोणता खेळाडू कोणत्या संघात?

IPL Auction 2023: मित्रांनो, कोची येथे आयोजित आयपीएल 2023 चा मिनी लिलाव (IPL Mini Auction 2023) काल सायंकाळी उशिरा पार पडलेला आहे. आयपीएल मधील सर्व 10 संघांनी आपले रिक्त स्थान पूर्ण भरलेले आहेत. यावेळी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू (Most Expensive Player in IPL History) म्हणून इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करण (Sam Curran) ठरला आहे. त्याला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले. याआधी 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसला 16.25 कोटींना खरेदी केलं होते.

IPL Auction 2023

सॅम करण आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानंतर, IPL Auction 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन (Cameron Green) दुसर्‍या क्रमांकाचा महागडा खेळाडू विकला गेला. कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटींना खरेदी केले आहे. तर ब्रिटिश ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींना खरेदी केले आहे. वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने १६ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. IPL ACTION २०२३

हॅरी ब्रूकवर (Harry Brook) पैशांचा पाऊस पडला

पहल्यांदाच आयपीएल लिलावात नोंदणी केलेल्या इंग्लंडच्या हॅरी ब्रुकवर (Harry Brook) पैशांचा बरसाव झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने हॅरी ब्रूकला १३.२५ कोटींना विकत घेतले, तर हैदराबादनेच मयंक अग्रवालला ८.२५ कोटींना विकत घेतले आहे.

लिलावात 405 खेळाडू सहभागी

सुरूवातीला लिलावात एकूण ९९१ खेळाडूंची यादी उपलब्ध होती, जी नंतर ४०५ पर्यंत छाटण्यात आली. कमी केलेल्या यादीनुसार, 2 कोटीच्या बेस प्राइसवर १९ खेळाडू लिलावात सामील झाले होते. १.५ कोटी ब्रॅकेटमध्ये ११ खेळाडू तर २० खेळाडू १ कोटी या मूळ किमतीत सहभागी झाले होते. दरम्यान, ९ खेळाडू ७५ लाख रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये ठेवण्यात आले होते. तर या आयपीएल लिलावात कोणते खेळाडू कोणत्या संघाने विकत घेतले हे खाली दिले आहे.

IPL Auction 2023 All Sold Players List

खेळाडू – खरेदीची किंमत (INR) – टीम

केन विल्यमसन – २ कोटी – GT

हॅरी ब्रूक – १३.२५ कोटी – SRH

मयंक अग्रवाल – ८.२५ कोटी – SRH

अजिंक्य रहाणे – ५० लाख – CSK

सॅम करन – १८.५० कोटी – PBKS

ओडियन स्मिथ – ५० लाख – GT

सिकंदर रझा – ५० लाख – PBKS

जेसन होल्डर – ५.७५ कोटी – RR

कॅमेरॉन ग्रीन – १७.५० कोटी – MI

बेन स्टोक्स – १६.२५ कोटी – CSK

निकोलस पूरन – १६ कोटी – LSG

हेनरिक क्लासेन – ५.२५ कोटी – SRH

फिल सॉल्ट – २ कोटी – DC

रीस टोपली – १.९ कोटी – RCB

जयदेव उनाडकट – ५० लाख – LSG

झ्ये रिचर्डसन – १.५ कोटी – MI

इशांत शर्मा – ५० लाख – DC

आदिल रशीद – २ कोटी – SRH

मयंक मार्कंडे – ५० लाख – SRH

शेख रशीद – २० लाख – CSK

विव्रत शर्मा – २.६ कोटी – SRH

समर्थ व्यास – २० लाख – SRH

सनवीर सिंग – २० लाख – SRH

निशांत सिंधू – ६० लाख – CSK

एन जगदीसन – ९० लाख – KKR

केएस भारत – १.२ कोटी – GT

यादव उपेंद्र सिंह – २५ लाख – SRH

वैभव अरोरा – ६० लाख – KKR

यश ठाकूर – ४५ लाख – LSG

शिवम मावी – ६ कोटी – GT

मुकेश कुमार – ५.५ कोटी – DC

हिमांशू शर्मा – २० लाख – RCB

मनीष पांडे – २.४ कोटी – DC

विल जॅक्स – ३.२ कोटी – RCB

रोमारियो शेफर्ड – ५० लाख – LSG

डॅनियल सॅम्स – ७५ लाख – LSG

काइल जेमिसन – १ कोटी – CSK

पियुष चावला – ५० लाख – MI

अमित मिश्रा – ५० लाख – LSG

हरप्रीत भाटिया – ४० लाख – PBKS

मनोज भंडगे – २० लाख – RCB

मयंक डागर – १.८ कोटी – SRH

दुयान यानसेन – २० लाख – MI

प्रेरक मंकड – २० लाख – LSG

डोनोव्न फरेरा – ५० लाख – RR

उर्विल पटेल – २० लाख – GT

विष्णू विनोद – २० लाख – MI

विद्वथ कावेरप्पा – २० लाख – PBKS

राजन कुमार – ७० लाख – RCB

सुयांश शर्मा – २० लाख – KKR

जोशुआ लिटल – ४.४ कोटी – GT

मोहित शर्मा – ५० लाख – GT

शम्स मुलाणी – २० लाख – MI

स्वप्नील सिंग – २० लाख – LSG

डेव्हिड विसे – १ कोटी – KKR

नितीश कुमार रेड्डी – २० लाख – SRH

अविनाश सिंग – ६० लाख – RCB

कुणाल राठोड – २० लाख – RR

सोनू यादव – २० लाख – RCB

कुलवंत खेजरोलिया – २० लाख – KKR

अजय मंडल – २० लाख – CSK

मोहित राठे – २० लाख – PBKS

नेहल वढेरा – २० लाख – MI

भगत वर्मा – २० लाख – CSK

शिवम सिंग – २० लाख – PBKS

रिली रोसो – ४.६ कोटी – DC

लिटन दास – ५० लाख – KKR

अकील हुसेन – १ कोटी – SRH

अॅडम झाम्पा – १.५ कोटी – RR

अनमोलप्रीत सिंग – २० लाख – SRH

केएम आसिफ – ३० लाख – RR

एम अश्विन – २० लाख – RR

मनदीप सिंग – ५० लाख – KKR

आकाश वशिष्ठ – २० लाख – RR

नवीन यु एल हक – ५० लाख – LSG

युधवीर चरक – २० लाख – LSG

राघव गोयल – २० लाख – MI

अबुल पीए – २० लाख – RR

जो रूट – १ कोटी – RR

शाकिब अल हसन – १.५ कोटी – KKR

1 thought on “IPL Auction 2023: सॅम करणवर लागली सर्वाधिक बोली, पहा कोणता खेळाडू कोणत्या संघात?”

Leave a Comment