Irrigation Scheme: ‘सिंचन योजने’तून या जिल्ह्याला ७०० वैयक्तिक शेततळे मंजूर

Agriculture Irrigation Scheme कोरोना काळामध्ये सरकारी निधीची अडचण असल्यामुळे मागेल त्याला शेततळे योजना (Farm Pond Scheme) बंद करण्यात आली होती. आता ही योजना ‘‘मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना’’ (Irrigation Scheme) या नावाने पुन्हा सुरू झालेली आहे. या योजने-अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६९० शेतकऱ्यांना येत्या वर्षभरात शेततळे देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केलेले आहे.

या योजनेतून आधी ३०×३०×३ मीटर (m) क्षेत्रासाठी जास्तीत जास्त रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान मिळत होते ते आता जास्तीत जास्त रु. ७५,०००/- रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. जिल्हा स्तरावरून शेततळ्यासाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे.

हे पण वाचा: pm kisan sanman nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता या दिवशी येणार

Irrigation Scheme

गावातील दुष्काळी भागामध्ये उन्हाळ्यात अथवा टंचाईच्या काळामध्ये कमी पाण्यात पीक घेता यावे, उभी असलेली पिके जगावी यासाठी कृषी विभागामार्फत ही योजना राबवली जात असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे खोदण्याकरिता अनुदान दिले जात आहे.

या योजनेमार्फत वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त होत असून, त्या अर्जांना मंजुरी देण्याचे काम सुरु आहे. नव्याने सुरू झालेल्या योजनेमधून कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे.

मागेल त्याला शेततळे ही योजना बंद असल्यामुळे शेततळे खोदण्याकरिता अनेक शेतकरी सतत विचारपूस करत होते. आता ही योजना चालू झाल्याने शेतकऱ्यांची ही अडचण दूर झाली आहे. दुष्काळी भागात संरक्षित सिंचनाकरिता शेतकऱ्यांना शेततळ्याचा आधार मिळाला आहे.

Irrigation Scheme

Leave a Comment