५०,००० रु अनुदान पात्र यादी मध्ये तुमच नाव तपासा आहे का नाही?

  शेतकरी बांधवांनो, २०१७-२०१८, २०१८-२०१९ आणि २०१९-२०२० या आर्थिक वर्षामध्ये कमीतकमी दोन वर्ष आपल्याला शासनाच्या माध्यमातून ५०,००० हजार रुपये अनुदान दिलं जाणाऱ्या अनुदानामध्ये तुम्ही पात्र आहात का? तसेच तुमचं कर्ज खात तुमचं सेविंग अकाउंट अचूक आहे का? (Karj Mafi List) तुमची किती रक्कम याच्या अंतर्गत पात्र दाखवते, हीच ऑनलाईन पद्धतीने माहिती कशाप्रकारे पाहयची याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, १२ सप्टेंबर २०२२ पासून याद्या मागवण्यात आल्या आहे आणि १५ सप्टेंबर २०२२ पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रकमेचे वितरण केलं जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये याद्या आल्याच्यानंतर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना KYC करावी लागते आणि केवायसी झाल्यानंतर या पात्र शेतकऱ्यांच्या सेविंग अकाउंटला ५०,००० रुपयाची किंवा पात्र असलेली अनुदानित रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते.

पात्र यादी

अनुदान पात्र याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. (Maharashtra Karj Mafi) मात्र, आलेल्या याद्या या अंदाजे ७.५ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची माहिती चुकीची आढळल्यामुळे अपात्र ठरवण्यात आल्या आहे. अनुदान पात्र याद्या पुन्हा एकदा १२ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रकाशित केल्या जातील. अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. मात्र १२ ऑक्टोबर २०२२ झाला तरी अजून देखील याद्या आलेल्या नाहीत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा उत्कंडेला लागली. आपण याच्यामध्ये पात्र असतोल की नाही. शेतकरी अनुदान पात्र यादीची वाट पाहत आहेत.   जर याच्यासाठी तुमचं खात कर्जासाठी पात्र असेल व माहिती सर्व बरोबर व अचूक असेल तर तुम्ही जवळील CSC सेंटर वर आपले माहिती आपल्या कर्ज खातं आपलं सेविंग खातं याच्याबद्दल ची माहिती तपासू शकता. तर या अनुदान पात्र योजनेत तुमचं नाव आहे का नाही पाहण्यासाठी तुमचा आधार कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिथे तुम्हाला तुमचं नाव देखील पाहता येणार आहे.

50,000 पात्र यादी

सीएससी केंद्रात तुमचं नाव या पद्धतीने दाखवले जाते इथे तुमचं नाव असेल पुढे बँकेचं नाव असेल कर्ज कोणत्या वर्षी घेतलेलं आहे ते वर्षे या ठिकाणी दाखवत असते. तसेच पुढे खाते नंबर असेल त्याच्यानंतर या ठिकाणी कर्जाची रक्कम सुद्धा दाखवली जाते. समजा या ठिकाणी तुमचा खाते नंबर चुकीचा असला, आधार कार्ड नंबर चुकला असेल, किंवा इतर माहिती चुकीची दिसत असल्यास तात्काळ ती माहिती दुरुस्त करून घ्या.   सीएससी मध्ये या पोर्टलवर आल्यावर आधार कार्ड नंबर टाकून जर अशा प्रकारे तुमची माहिती दाखवत नसेल, तर समजा तुम्ही या ५०,००० अनुदानासाठी अपात्र आहे असे कळते. अशाप्रकारे तुमचा आधार कार्ड घेऊन सीएससी केंद्रात जा आणि तिथे या पद्धतीने तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही हे पाहून घ्या. तसेच एखाद्या ठिकाणी माहिती चुकली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या कारण २० ऑक्टोबर पासून हे प्रस्थान अनुदान वाटप करण्यात येऊ शकते.  

अनुदान पात्र यादी मध्ये नाव तपासा

 

 

Leave a Comment