KissanGPT | सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे. नवीन आलेलं एक तंत्रज्ञान म्हणजे Chat GPT. चॅट जीपीटीनं सगळं जग हादरवून टाकलं आहे. एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कमी करायला हवा असा सल्ला दिला आहे. openai chat हे जरी खरं असलं तरी यात नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. संगणक शास्त्रज्ञ प्रतीक देसाई यांनी किसान जीपीटी हा नवीन चॅटबॉट बनवला आहे. कृषी प्रधान भारताला याचा मोठा फायदा होणार आहे.
काय आहे | KissanGPT
भारतीय शेतकर्यांना मदत करण्यासाठी Kissan GPT नावाचा नवीन एआय-चॅटबॉट (AI Chatbot) लॉन्च करण्यात आला आहे. openai chat सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले प्रतिक देसाई यांनी हे विकसित केलं आहे. हे सर्वात आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे. हा चॅटबॉट भारतातील नऊ भाषांमध्ये शेतीविषयक चर्चा करू शकणार आहे. या माध्यमातून कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञासोबत संवाद तोही मातृभाषेत होणार आहे. भारत एक कृषी प्रधान देश आहे. हा एआय चॅटबॉट शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी ठरु शकतो. शेतीत येणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यास आणि त्यांच्या शेतातून अधिक उत्पादन काढण्यास हे तंत्रज्ञान मदत करु शकेल.
असा मिळणार सल्ला openai chat
शेतकऱ्यांना सल्ल्यासाठी एक तर सरकारवर किंवा खाजगी संस्थांवर अवलंबून राहावं लागत. मात्र आता हा सल्ला घर बसल्या एका क्लिकवर मिळणार आहे. यामार्फत सिंचन, पीक लागवड, कीड नियंत्रण आणि इतर शेतीशी संबंधित विषयांवर योग्य वेळी सल्ला देऊ शकते. स्मार्टफोन द्वारे शेतकरी चॅटबॉटशी संवाद साधू शकतात. प्रतीक देसाई यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या Kissan GPT च्या माध्यमातून शेतकरी आणि तज्ज्ञ यांच्यातील दुरावा कमी होण्यास मदत होईल.
काय आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
KissanGPT चा वापर याआधी काही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. पिकांबद्दल योग्य निर्णय घेण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत झाली असं काही शेतकऱ्यांनी याच्या वापरानंतर म्हटलं आहे. भारतातील शेतकरी अधिकाधिक नवनवीन तंत्रज्ञान, KissanGPT कडे वळत आहेत. हे चॅटबॉट आता शेतकर्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.