हे झाल्यानंतर तुमच्यासमोर वापरकर्ता नोंदणी पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. त्यानंतर लॉगिन Log in यावर क्लिक करा, यानंतर तुम्ही जो यूजर आयडी बनवला होता तो युजर आयडी आणि पासवर्ड तिथे टाका.
यामध्ये आपण आपले सातबारा फेरफार खाते उतारा पाहू शकतो. सुरुवातीला आपण खाते उतारा कसा कडता येईल हे पाहूया. सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
हा कार्यक्रम सध्या फक्त सात जिल्ह्यांसाठी आहे. नंतर सर्व जिल्हे या मध्ये घेण्यात येणार आहेत.
नंतर आपला तालुका व गाव आणि अभिलेखाचा प्रकाराची निवड करायची आहे. आपण जर फेरफार उतारा निवडला असेल तर गट क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचा आहे.
58 अभिलेख प्रकार यामध्ये देण्यात आलेले आहे पैकी तुम्हाला जो अभिलेख पाहिजे असेल त्यावर क्लिक केले की, तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित खाते उतारा तुम्हाला दिसेल. फेरफार क्रमांक वर्ष दिलेला असतो, त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि संबंधित खाते उतारा तुमच्यासमोर ओपन होईल. कार्ट मध्ये ठेवा असा पर्याय तिथे येईल. त्यावर क्लिक केलं तुमच्यासमोर आपला खाते उतारा दिसून येईल.
तुम्हाला हा खाते उतारा डाऊनलोड करता येतो. डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर खाते उतारा दिसायला लागेल. या जमिनीच्या उताऱ्यामध्ये अधिकार अभिलेख मध्ये काय बदल झाले कधी झाले याची माहिती आपल्याला लगेच समजून येईल. त्याचप्रमाणे तुम्ही जर सातबारा हे ऑप्शन निवडले.
तर सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करून तुम्ही सातबारा उतारा पाहू शकता. अशाप्रकारे मित्रांनो अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण 1880 पासून खाते उतारे, सातबारा आणि फेरफार ऑनलाइन आपण सहजपणे बघू शकता. डाऊनलोड करू शकता आणि त्याची कॉपी आपल्या जवळही ठेवू शकता.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा