Land Subsidy| खुशखबर ! शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; जाणून घ्या, कसा मिळणार लाभ?

Land Subsidy| खुशखबर ! शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; जाणून घ्या, कसा मिळणार लाभ?

Land Subsidy|सरकार लोकांसाठी अनेक लाभदायक योजना राबवत असते. कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत सरकारी योजना (Government Schemes) पोहोचाव्यात आणि त्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. यासाठी सरकार प्रयत्न करत असते. दरम्यान कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही सरकार मार्फत राबविण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील व भूमिहीन मजुरांसाठी ही योजना चालू केलेली आहे. या योजनेमार्फत पात्र लोकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी सरकारकडून अनुदान Land Subsidy दिले जात आहे. २००४-२००५ पासून ही योजना राबवली जात आहे. भूमिहीन कुटूंबातील नागरिकांना आर्थिक स्थैर्यता लाभावी यासाठी ही योजना चालू करण्यात आली होती.

हे पण वाचा: pm kisan sanman nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता या दिवशी येणार

१०० टक्के अनुदानावर मिळते जमीन | Land Subsidy

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेमधून १००% अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. ऑगस्ट २०१८ पासून या योजनेमार्फत १००% अनुदानावर (Land subcidy) पात्र लाभार्थ्यास शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये 4 एक्कर जिरायती किंवा 2 एकर बागायती जमीन दिली जाते.

२०२ शेतकऱ्यांना मिळाली ५७० एकर जमीन | Land Subsidy

या भूमिकेवर आतापर्यंत वर्धा (Wardha) जिल्ह्यातील २०२ शेतकऱ्यांना ५७० एक्कर शेत जमिनीचे (Agriculture Land) वाटप झालेले आहे. २०२१-२२ मध्ये आर्वी व आष्टी तालुक्‍यामध्ये जमीन वाटप केले होते. त्यावेळी ३६ एक्कर जिरायती व ८१ एकर बागायती जमीन ४६ लाभार्थ्यांना वाटप केली होती. यावर्षीसाठी सुद्धा वाटपासाठी जमीन खरेदीची प्रक्रिया चालू आहे.

Eligibility | पात्रता | Land Subsidy

१) या योजनेच्या लाभ घेण्यासाठी व्यक्‍ती हा अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील असावा.
२) महत्त्वाची बाब म्हणजे लाभ घेणारा व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन मजूर असणे गरजेचे आहे.
३) विधवा आणि परितक्‍त्या महिलांना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते.
४) लाभार्थीचे वय हे १८ ते ६० गटातील असणे गरजेचे आहे.

Leave a Comment