Land Subsidy: ब्रेकिंग! शेतकऱ्यांना 570 एकरासाठी 11 कोटींचे अनुदान वाटप, जमीन खरेदी अनुदानासाठी ‘या’ योजनेत त्वरित करा अर्ज

Land Subsidy: ब्रेकिंग! शेतकऱ्यांना 570 एकरासाठी 11 कोटींचे अनुदान वाटप, जमीन खरेदी अनुदानासाठी ‘या’ योजनेत त्वरित करा अर्ज

Land Subsidy | केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत नेहमी सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असतो. गरिबांना विविध योजनांच्या माध्यमातून आपली आर्थिक स्थिती (Land Subsidy) सुधारण्याची संधी देण्यात येते. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे. यासाठी सरकार प्रयत्नशील काम करत आहे. दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठी राज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत या नागरिकांना थेट जमीन (Land Subsidy) खरेदी करण्यासाठी तब्बल 100% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

11 कोटींची जमीन वाटप

आता दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सबलीकरण योजने मधून जमीन (Land Subsidy) खरेदीसाठी १०० टक्के अनुदान दिले जात आहे. याचं योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील 200 नागरिकांना 500 एकर एवढी शेत जमिनीसाठी तब्बल 11 कोटी एवढा निधी अनुदान म्हणून देण्यात आला असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान देखील मिळते. या अनुदानासाठी राज्यामध्ये 2022-23 साठी तब्बल 150 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

काय आहे योजना? | Land Subsidy

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना शेतजमीन खरेदीसाठी 100% अनुदान मिळत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी (Land Purchase Subsidy) राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला असून, आता ही योजना 100% अनुदानाची करण्यात आली आहे.

काय आहेत अटी अन् कोणाला मिळेल लाभ?

खरं तर, दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे या मजुरांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. तसेच राहणीमान देखील सुधारेल. त्याचबरोबर मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होईल.

आवश्यक कागदपत्रे

Leave a Comment