LPG Rate 2023: गॅस ग्राहकांसाठी खुशखबर, गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल इतक्या रुपयांची कपात, असे आहेत नवीन दर

LPG Rate: एलपीजी गॅस (LPG) सिलेंडरच्या वाढलेल्या दराने लोक परेशान असतानाच या दरात तब्बल 92 रुपये एवढी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ही कपात फक्त व्यावसायिक ग्राहक एलपीजी गॅस (COMMERCIAL LPG) सिलेंडरसाठीच करण्यात आली आहे.

आपले नवीन आर्थिक वर्ष हे एप्रिल पासून चालू होते. या नवीन आर्थिक वर्षामध्ये महागाईपासून काही दिलासा मिळणार का याची वाट देशभरातील जनता पाहत होती. ऑईल आणि पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केलेल्या 92 रुपयांच्या कपातीमुळे या गॅसचा वापर करणाऱ्यांचा बोजा कमी झाला आहे. असं असलं तरीही घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांना आहे तीच रक्कम द्यावी लागणार आहे. LPG Rate

देशभरात असे आहेत दर | LPG Rate

मुंबई व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 1,980 रुपये इतका आहे तर चेन्नई मध्ये 2192.50 रुपये एवढा दर आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा दर 2,048 आहे तर कोलकात्यामध्ये 2,132 रुपये एवढा दर आहे. तसेच मुंबईमध्ये घरगुती गॅस 1,125 रुपये तर दिल्लीमध्ये 1,103 रुपये एवढा आहे.

घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा नाहीच

घरगुती गॅस कंपन्या ह्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस दरांत बदल करत असतात. गेल्या महिन्यामध्ये घरगुती LPG गॅस दरामध्ये कंपन्यांनी 50 रुपये वाढ केली होती.

Leave a Comment