गेल्या अनेक दिवसांपासून गॅसचे दर (LPG Subsidy) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सर्वसामान्यांना दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने LPG Subsidy गॅस खरेदीवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या LPG सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला गॅस योजने-अंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षापर्यंत वाढवली आहे. गॅस वरील अनुदान 14.2 किलोच्या 1 महिन्यातील फक्त 1 गॅसला म्हणजे 12 महिन्यातील 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे.
हे पण वाचा: Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर
LPG Subsidy Rate
1 एप्रिल पासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे सुमारे 1.6 कोटी कुटुंबांना या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांचे अनुदान मिळते. म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपये अनुदान मिळणार आहे.