MahaDBT Farmer Scheme: शेतकरी महा-डीबीटी सर्व योजना मध्ये अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे

MahaDBT Farmer Scheme

नमस्कार, मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरून तुम्ही भरपूर योजनेसाठी अर्ज केले असतील. कोणत्याही योजनेमध्ये जर तुमचं नाव लागलं असेल म्हणजे तुमचं लॉटरीमध्ये जर नाव लागलं तर तुम्हाला सर्वात अगोदर कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत? कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत? याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

कृषि विभागाच्या योजनांसाठी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करायाची आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. (अगोदर महा डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांक अपडेट केला असल्याची खात्री करून घ्या, आधार प्रोफाईल नसेल तर अनुदान वितरण होणार नाही याची देखील काळजी घ्या)

कांदा चाळ योजनेसाठी MahaDBT Farmer Scheme

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र) असणे आवश्यक आहे.
 • 7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल, तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र अपलोड कराव लागेल.
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असेल तर
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे. (असल्यास)

प्लास्टिक मल्चिंग योजनेसाठी MahaDBT Farmer Scheme

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • 7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र लागेल.
 • चतुःसीमा नकाशा (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) लागणार आहे.
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.

हरितगृह / शेडनेटगृह योजनेसाठी MahaDBT Farmer Scheme

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1) लागेल.
 • विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र 2) लागेल.
 • चतुःसीमा नकाशा अपलोड करणे गरजेच आहे.
 • वैजात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे. (सामाईक क्षेत्र असल्यास)

कृषि यांत्रिकीकरण योजना MahaDBT Farmer Scheme

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • मंजूर यंत्र / औजाराचे कोटेशन लागेल. (GST) सोबत
 • मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
 • Tractor चलित औजारासाठी RC असणे आवश्यक आहे.
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.
 • केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पावर टिलर व ट्रक्टर लाच अनुदान वैद राहील, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पावर टिलर व ट्रक्टर ला पूर्वसंमती देण्यात येणार नाही.
 • पूर्वसंमती पूर्वी खरेदी करण्यात आलेल्या यंत्र/औजाराला अनुदान वैद असणार नाही.
 • औजारे बँकेसाठी खरेदी करावयाच्या सर्व यंत्र/औजारांचे कोटेशन व वैध टेस्ट रिपोर्ट अपलोड करणे गरजेच आहे.

क्षेत्र विस्तार (Dragon Fruit) योजना

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • विहित नमुन्यात हमीपत्र जोडणे.
 • अंदाजपत्रक जोडणे.
 • स्थळदर्शक नकाशा असणे आवश्यक आहे.
 • चतुःसीमा असणे आवश्यक आहे.
 • वैध जात प्रमापत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.

 • ठिबक / तुषार / PVC पाईप स्कीम
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट 19) 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र असणे आवश्यक आहे.
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास

पंपसंच योजना (ISI/BEE किमान 4 स्टार रेट केलेले लेबल केलेले)

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • मंजूर घटकाचे कोटेशन असणे आवश्यक आहे.
 • मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्ट अपलोड करणे आवश्यक
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.
 • 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसेल तर विहीर, शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणा पत्र असणे आवश्यक आहे.
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • विहित नमुन्यातील हमीपत्र असणे आवश्यक आहे.
 • प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.

भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • स्थळदर्शक नकाशा चतुःसीमा असणे आवश्यक आहे.
 • विहित नमुन्यातील हमीपत्र असणे आवश्यक आहे.
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास

वैयक्तिक शेततळे योजना (NPSM/MTS)

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 असणे आवश्यक आहे.
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ असणे आवश्यक आहे.
 • स्थळदर्शक नकाशा असणे आवश्यक आहे.
 • चातु:सीमा असणे आवश्यक आहे.
 • वैध जात प्रमणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) असल्यास
 • शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर किमान 0.60 हे. जमीन असणे गरजेच आहे.

2 thoughts on “MahaDBT Farmer Scheme: शेतकरी महा-डीबीटी सर्व योजना मध्ये अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे”

Leave a Comment