विद्युत सहाय्यकाची 5000 आणि उपकेंद्र सहाय्यकाची 2000 पदं भरली जात आहेत, ज्यासाठी 26 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. कंत्राटी पद्धतीच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळेल. महावितरणने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
mahadiscom recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये तब्बल 7000 जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. विद्युत सहाय्यकाची 5000 आणि उपकेंद्र सहाय्यकाची 2000 पदं भरली जात आहेत, ज्यासाठी 26 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. कंत्राटी पद्धतीच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळेल. महावितरणने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
कोणत्या पदासाठी किती जागा?
विद्युत सहाय्यक – 5000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)
उपकेंद्र सहाय्यक – 2000 (विविध आरक्षणानुसार जागांचं वितरण)
शैक्षणिक पात्रता, वय आणि मानधन
उमेदवार किमान 12 वी पास असणं आवश्यक आहे, तसंच त्याच्याकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रमाणपत्र दिलं जातं.
उमेदवाराचं वय 18 ते 27 या दरम्यान असणं गरजेचं आहे. विविध आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू राहिल.
निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षासाठी दर महिन्याला 19000, दुसऱ्या वर्षात 31000 आणि तिसऱ्या वर्षात 41000 मानधन मिळेल. या मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजा होईल.