Maharashtra Shikshak Bharti 2023
For the past few days, the state government has been making noise and announcing that the recruitment of teachers will start. Education Minister no. Deepak Kesarkar has announced the teacher recruitment schedule. However, no information has been given about when the registration of students will start, so there is an atmosphere of confusion among the candidates. This schedule is likely to be applicable only if registration starts from August 1.
Maharashtra Shikshak Bharti 2023
राज्यभरात शिक्षकांच्या ६० हजारापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, ८० टक्के रिक्त जागा भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिल्यानंतरही ३० हजार शिक्षकांचीच भरती करण्यासाठी शिक्षणमंत्री ठाम आहे.
त्यातच शिक्षण विभागाने कुठलेही नियाेजन न करता आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचे चित्र आहे, त्यातच शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाचे असलेले विद्यार्थ्यांची नाेंदणी केव्हा सुरू हाेईल याचा उल्लेखच नाही, १५ ऑगस्टपासून पाेर्टलवर जाहिराती येतील, त्यानंतर विद्यार्थी थेट प्राधान्यक्रम देणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे.
मात्र नाेंदणीच नसताना विद्यार्थ्यांना शाळा कशा येतील असा प्रश्न आता उमेदवारांकडून उपस्थित केल्या जात आहेत, त्यातच पाेर्टलवर ३१ जुलैपर्यंत नाेंदणी विषयी कुठल्याही सूचना आल्या नसल्याने संभ्रम वाढला आहे.
Maharashtra Shikshak Bharti 2023
शासनाने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सुरू केलेली २०१७ शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही, त्यातच घाेषणा १२ हजार रिक्त पदे भरण्याची करण्यात आली हाेती, मात्र प्रत्यक्षात १९६ व्यवस्थापनाच्या जागांची अजूनही प्रक्रिया सुरू आहे, यावर्षी ३० हजार जागा भरण्याची घाेषणा करण्यात आली, प्रत्यक्षात किती जागा भरणार हे पवित्र पाेर्टलवर आलेल्या जाहिरातीनंतर स्पष्ट हाेणार आहे.
जागा कमी आल्यास कटऑफही वाढणार आहे. नाेंदणी सुरू करण्याची मागणी शिक्षक भरतीसाठी लाखाे विद्यार्थी नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी जवळपास १० ते १५ दिवसांचा वेळ लागणार आहे.
त्यामुळे जाहिराती येण्यापूर्वी पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी झालेली असणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पवित्र पाेर्टलवर कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत, त्यामुळे शिक्षक भरतीची घाेषणा केवळ घाेषणाच ठरू नये, अशी भीती आता उमेदवारांमधून व्यक्त हाेत आहे.
Maharashtra Shikshak Recruitment 2023
Maharashtra Shikshak Bharti 2023 – There is good news for teachers in the state who are waiting for jobs. Education Minister Deepak Kesarkar has made a big announcement that 50 thousand teachers will be recruited in the state soon.
Kesarkar also said that this will be the biggest teacher recruitment in the history of Maharashtra, there will be no shortage of teachers. At present, there are 60,000 vacant posts in secondary and higher secondary, district councils, municipalities, municipalities and other institutions in the state. Of these, 18,000 are only in Zilla Parishads. Maharashtra Shikshak Bharti 2023
केसरकर म्हणाले, राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत देखील केसरकर यांनी भाष्य केले.
विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत केसरकर यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे असं केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं.
Maharashtra Shikshak Bharti 2023
आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनाही देखील यावेळी केसरकर यांनी दिल्या आहेत.
तब्बल बारा वर्षांपासून रखडलेली मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यास राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दिला आहे. सध्या रिक्त असलेल्या ६० हजार जागांपैकी ३० हजार जागा भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या जागा भरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने निश्चित करून दिलेल्या नियमावलीच्या आधारे रिक्त जागा भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करावी, असा आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे. सध्या राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी संस्थांमधील मिळून एकूण ६० हजार जागा रिक्त आहेत.
यापैकी १८ हजार फक्त जिल्हा परिषदांमधील आहेत. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार ६० हजारांपैकी निम्म्या जागा भरल्या जाणार आहेत. २१ जून २०२३ रोजी सरकारने याबाबतची भरती प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. Maharashtra Shikshak Bharti 2023
राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी होती. ही बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू होत नसल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, राज्यातील तत्कालीन महायुती सरकारने २०१९ मध्ये ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली होती. त्या वेळी सुमारे पावणे दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांतील १६ हजार ७४८ आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमधील १ हजार ३०१ जागांचा समावेश आहे. प्रत्यक्षात कन्नड, बंगाली, तेलगू, गुजराती अशा भाषांच्या शिक्षकांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. Maharashtra Shikshak Bharti 2023
नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांने रितसर राजीनामा देऊन पुन्हा विहीत प्रक्रियेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक राहील. ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची सन 2022 मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे.
तसेच, सदर बदल्यांमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेऊन जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Maharashtra Shikshak Bharti 2023 – आंतरजिल्हा बदली संपूर्णत: बंद करण्याची तरतूद ग्रामविकास विभागाने त्यांच्या बदली धोरणामध्ये करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. तर जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात येणार आहे.
जिल्हाअंतर्गत आपसी बदली सुद्धा वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने पती पत्नी एकत्रिकरणांतर्गत आदी अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे