राज्यभरात शिक्षकांच्या ६० हजारापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत, ८० टक्के रिक्त जागा भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिल्यानंतरही ३० हजार शिक्षकांचीच भरती करण्यासाठी शिक्षणमंत्री ठाम आहे.
त्यातच शिक्षण विभागाने कुठलेही नियाेजन न करता आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकच नसल्याचे चित्र आहे, त्यातच शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, यामध्ये सर्वात महत्त्वाचे असलेले विद्यार्थ्यांची नाेंदणी केव्हा सुरू हाेईल याचा उल्लेखच नाही, १५ ऑगस्टपासून पाेर्टलवर जाहिराती येतील, त्यानंतर विद्यार्थी थेट प्राधान्यक्रम देणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे.
मात्र नाेंदणीच नसताना विद्यार्थ्यांना शाळा कशा येतील असा प्रश्न आता उमेदवारांकडून उपस्थित केल्या जात आहेत, त्यातच पाेर्टलवर ३१ जुलैपर्यंत नाेंदणी विषयी कुठल्याही सूचना आल्या नसल्याने संभ्रम वाढला आहे.
शासनाने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सुरू केलेली २०१७ शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही, त्यातच घाेषणा १२ हजार रिक्त पदे भरण्याची करण्यात आली हाेती, मात्र प्रत्यक्षात १९६ व्यवस्थापनाच्या जागांची अजूनही प्रक्रिया सुरू आहे, यावर्षी ३० हजार जागा भरण्याची घाेषणा करण्यात आली, प्रत्यक्षात किती जागा भरणार हे पवित्र पाेर्टलवर आलेल्या जाहिरातीनंतर स्पष्ट हाेणार आहे.
जागा कमी आल्यास कटऑफही वाढणार आहे. नाेंदणी सुरू करण्याची मागणी शिक्षक भरतीसाठी लाखाे विद्यार्थी नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी जवळपास १० ते १५ दिवसांचा वेळ लागणार आहे.
त्यामुळे जाहिराती येण्यापूर्वी पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी झालेली असणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पवित्र पाेर्टलवर कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत, त्यामुळे शिक्षक भरतीची घाेषणा केवळ घाेषणाच ठरू नये, अशी भीती आता उमेदवारांमधून व्यक्त हाेत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा