मोठी बातमी! 7/12 उतारा जोडून ‘इथे’ करा अर्ज, ‘महावितरण’ देईल ३ दिवसांत वीज कनेक्शन

जॉईन व्हॉट्सॲप ग्रूप

महावितरणच्या Mahavitaran ॲपवरील ए-वन फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरतेवेळी शेतकऱ्यांनी स्वत:ची माहिती व जमिनीचा 7/12 उतारा अपलोड करावा. त्यावर बोअर किंवा विहिरीची नोंद असणे गरजेचे आहे. त्यानंतर कनेक्शन घेण्याकरिता ३ ते ४ हजारांचा खर्च आणि सेक्युरिटी डिपॉझिट प्रती ‘एचपी’ ला १,००० रुपये भरल्यास तीन दिवसांमध्ये विद्युत जोडणी करून दिली जाते. पण, वीजेचा खांब आणि कनेक्शनमधील अंतर ३० मीटरपर्यंत असणे बंधनकारक असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यामधील २१,००० शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत कृषी पंपाचे कनेक्शन देण्याचे नियोजन ‘महावितरण’ Mahavitaran तर्फे केले आहे. दुसरीकडे जून २०२१ नंतर अर्ज केलेल्या ८,०७५ शेतकऱ्यांना अजून सुद्धा कनेक्शन मिळालेले नाही.

7/12 वीज कनेक्शन घेण्यासाठी शेतामध्ये डीपी (ट्रान्स्फॉर्मर) बसवावा लागणार आहे. त्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणे अपेक्षित आहे. शासनाकडून वीज कनेक्शन अनुदान प्राप्त झाल्याने जून २०२१ आधीच्या अर्जदारांना ‘महावितरण’ने Mahavitaran कनेक्शन जोडून दिलेले आहे. आता सरकारकडून महावितरणला निधी प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्याने उर्वरित शेतकऱ्यांना वीज जोडणी करून दिली जाईल. वीज चोरी रोखण्यासाठी वेळेच्या आत कनेक्शन देणे, हा पर्याय रास्त मानला जातो. दरम्यान, कनेक्शनसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन किंवा संबंधित कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज करण्याची मुभा आहे.

शेतकऱ्यांना ‘सोलर’चा फायद्याचा पर्याय

३ एचपी कनेक्शनच्या सोलार पंपासाठी (Solar Pump) जवळपास १३,५०० रुपये तर ५ ‘एचपी’चा पंप २७ ते २८ हजार रुपयापर्यंत बसवून मिळू शकतो. फक्त १०% रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. बाकी ९०% अनुदान ‘महावितरण’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते. सोलर पॅनल बसविल्यानंतर संबंधित कंपनी मोटरीसह पाणी बाहेर काढून देते.

‘महावितरण’ने Mahavitaran आता ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या वीज कनेक्शन धारकांना सोलर पॅनल बसविण्याची अट मांडलेली आहे. इतर शेतकरी देखील सोलर पॅनलकरिता अर्ज करू शकतात. डिसेंबर २०२५ पर्यंत ३०% फिडर सोलारवर केले जाणार असून त्यादृष्टीने जागांची निवड करण्यात येणार आहे. 7/12

Leave a Comment