PM Kisan Sanman Yojana
पीएम किसान सन्मान निधी योजने-अंतर्गत देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांची मदत देण्यात येते. पीएम किसान सन्मान निधी ही योजना २०१८ पासून (Central Government) केंद्र सरकारने सुरु केली आहे.
Kisan Sanman Yojana
या व्यतिरिक्त यामध्ये आता पर्यंत १२ हप्ते (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारची ही योजना सुरु असताना याच पद्धती प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. (Mukhyamantri Kisan Sanman Yojana) मुख्यमंत्री किसान सन्मान योजने-अंतर्गत प्रत्येक वर्षी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचे प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ६ हजार रुपये आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी या दोन्ही योजने-अंतर्गत ६ हजार असे मिळून वर्षाला १२ हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
- ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लवकरच चालू होणार
केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारच्या मार्फत मुख्यमंत्री किसान सन्मान निधी (Mukhayamantri Kisan Yojana) ही योजना सुरु केली जाणार आहे. यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार पहा, केंद्र सरकारचे नियम राज्यासाठीही असणार हे अजून स्पष्ट केले गेले नाही. पण महाराष्ट्र किसान योजनेचा लाभ राज्यामधील लाखो शेतकऱ्यांना होईल असे सांगण्यात आले आहे.
- शेतकऱ्यांना या योजनेतून मिळेल आर्थिक लाभ
शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना आर्थिक संकटाचा करावा लागू नये. म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. आता आर्थिक मदत करुन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना (Mukhyamantri Kisan Yojana) आता लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री किसान योजने विषयी नियम व अटी लवकरच समोर येतील.
- मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता
शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महात्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी ही योजना (Mukhyamantri Kisan Yojana) पात्र शेतकऱ्यांसाठी सुरु केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या काळातच ही योजना सुरु होणार आहे. तसेच फक्त अल्पभूधारक शेतकरीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत. येणाऱ्या आर्थिक वर्षातील बजेटमध्ये निधीची तरतूद करणार आहे.
- विभाग पातळीवर काम सुरु
एकनाथ शिंदे यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिलेली असून विभागपातळीवर या योजनेचे काम देखील सुरु झाले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी ६ हजार नाही तर १२ हजार रुपये दिले मिळणार आहेत.
2 thoughts on “Yojana: मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु”