New Districts List : महाराष्ट्र निर्मितीच्या इतिहासात जर पाहायला गेलं तर गुजरात आणि महाराष्ट्र एकेकाळी हे दोन राज्य एक होती कालांतराने भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले तसेच गुजरात हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले.गुजरातने मुंबई घेण्यासाठी भरपूर आटापिटा केला परंतु मुंबई त्याला मिळाली नाही आणि महाराष्ट्र 01 मे 1960 रोजी अस्तित्वात आला, महाराष्ट्र जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा अनेक जिल्हे लोकसंख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असल्याने प्रशासकीय कामासाठी नागरिकांना जाण्या-येण्याचे अडचण होत होती पूर्ण दिवस दिवस तिथे जाण्यासाठी लागत होता.