Nuksan bharpai Maharashtra 2023 : महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांसाठी 1071 कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर, कोणते जिल्हे आहेत पहा

जून ते जुलै, २०२३ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रु.१०७१७७.०१ लक्ष (अक्षरी रुपये एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष एक हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

 

हे ही वाचा : आनंदाची बातमी..! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल इतक्या रुपयांनी झाली घसरण

या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म-११ यांनी डिबीटी प्रणालीमार्फत हा निधी वितरित करावा. जिल्हाधिकारी यांनी वर अनुक्रमांक २ येथे नमूद दि.२४.०१.२०२३ अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करुन ती संगणकीय प्रणालीवर भरावी.

 

अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment