Onion Subsidy | ब्रेकिंग! राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदानासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

Onion Subsidy | राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यांमध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याच कांदा अनुदानासाठी (Onion Subsidy) तब्बल 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Onion Subsidy कांदा अनुदानासाठी अटी व शर्ती

  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल.
  • जे शेतकरी उशिरा खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून उशिरा खरीप कांदा खरेदीसाठी उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री करतील त्यांच्यासाठी ही योजना लागू राहील.
  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात यावी.
  • परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही सदर अनुदान थेट बैंक हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बचत बैंक खात्यात जमा केले जाईल.
  • सदर अनुदान आयसीआयसीआय बँकेमार्फत अदा करण्यात यावे.
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, 7/12 चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा.

Leave a Comment