Onion Subsidy | कांद्याच्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक क्विंटल 350 रुपयांचे अनुदान (Agricultural Subsidy) देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित केला आहे. राज्य सरकारच्या या महत्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता कांदा उत्पादक (Onion Subsidy) शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची माहिती मिळाली आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अखेर अनुदान (Onion Subsidy) मंजूर झाले आहे.
कांदा उत्पादकांसाठी महत्वपूर्ण शासन निर्णय Onion Subsidy
2018 आणि 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केलेली आहे. पण अद्याप देखील पात्र नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. या शेतकऱ्यांसाठी दि: 21 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला आहे. या शेतकऱ्यांना पात्र करून अनुदानासाठी (Agricultural Subsidy) लागणाऱ्या निधीची तरतूद या शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
हे पण वाचा: Pik Vima 2022 पिक विमा साठी 62 कोटी 93 लाख रुपये निधी मंजूर
किती निधी वितरीत करण्यास मंजुरी?
2018 आणि 19 मध्ये लक्ष्मी सोपान ॲग्रीकल्चर प्रोड्युस मार्केटिंग कंपनी लिमिटेड (Lakshmi Sopan Agriculture Produce Marketing Company Limited) बार्शी जिल्हा सोलापूर बाजार समितीमध्ये, कांद्याची विक्री केलेल्या पात्र लाभार्थ्यांना अवलंबित कांदा अनुदान मिळणार आहे. या वर्षांमध्ये या जिल्ह्यातील कांदा विक्री केलेल्या 8,074 शेतकऱ्यांना 7 कोटी 47 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.